एक्स्प्लोर

NCP Crisis : आमदारांच्या अपात्रतेच्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी अजून एक महिना वेळ द्या, अजित पवार गटाची विधानपरिषदेकडे मागणी

Sharad Pawar Vs Ajit Pawar : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना विधान परिषदेकडून नोटिस पाठवण्यात आली होती, त्यावर आता अजित पवार गटाने अधिक वेळाची मागणी केली आहे.

मुंबई: विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी अजित पवार (Ajit Pawar) गटाने अपात्रतेबाबतच्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी 1 महिन्याचा अधिकचा वेळ मागितला आहे. 5 डिसेंबरला आमदारांना विधीमंडळाकडून आठ दिवसांत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. यावर आता अजित पवार गटाने उत्तरासाठी एक महिना अधिकचा कालावधी मागितला. शरद पवार गटाने (Sharad Pawar) मात्र आमदार अपात्रतेच्या नोटिसीला उत्तर सादर केले आहे. 

शरद पवार गटातील एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरूण लाड यांना विधान परिषद आमदार अपात्रतेबाबत नोटिस देण्यात आली आहे. तर अजित पवार गटात अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, रामराजे नाईक निंबाळकर, विक्रम काळे, बाबाजानी दुर्राणी, सतीश चव्हाण यांना नोटीस देण्यात आली आहे. 

दोन्ही गटांच्या आमदारांना नोटिस

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज (8 डिसेंबर) विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आठ दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटिसांमधून देण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या शरद पवार  गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या दाखल केलेल्या याचिकेनंतर या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, आदिती झटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 

शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्या याचिकेवरून रामराजे नाईक निंबाळकर यांना नोटीस काढण्यात आली होती. तर अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांच्याकडून दाखल याचिकेत एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड यांच्या नावाचा समावेश आहे. दोन्ही गटांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांमध्ये आपलं उत्तर सादर करण्याचा आदेश या नोटीसमधून देण्यात आला होता. 

म्हणणं लेखी स्वरुपात देण्याचे आदेश

नोटीसीमध्ये पक्षांतराच्या कारणावरून सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषद सदस्य नियम 1986 अंतर्गत आपलं म्हणणं लेखी स्वरुपात सात दिवसात देण्याचे उपसभापती यांनी विधानसभा परिषद सदस्यांना निर्देश दिले होते. आठ दिवसांमध्ये उत्तर न आल्यास आपलं याबाबत काहीचं म्हणणं नसल्याचे गृहित धरून सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असाही नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला होता. 

निवडणूक आयोगात सुनावणी सुरू 

दुसरीकडे राष्ट्रवादी कोणाची, पक्षावर दावा कुणाचा यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात भूमिका मांडण्यात आली आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाचा एकमेकांवर बनावट शपथपत्रं सादर केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो असा सवाल शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्षपदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. 

ही बातमी वाचा: 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Nagpur Accident: ई-बाईक खड्ड्यातून उसळली, अंजली थेट दुभाजकावर आदळली; तेवढ्यात मागून येणाऱ्या नागपूर मनपाच्या इलेक्ट्रिक बसनं चिरडलं, जागीच दुदैवी अंत
ई-बाईक खड्ड्यातून उसळली, अंजली थेट दुभाजकावर आदळली; तेवढ्यात मागून येणाऱ्या नागपूर मनपाच्या इलेक्ट्रिक बसनं चिरडलं, जागीच दुदैवी अंत
Abdul Sattar Meet Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत तक्रार; अब्दुल सत्तार म्हणाले, 'मी मित्र म्हणून आलोय', नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत तक्रार; अब्दुल सत्तार म्हणाले, 'मी मित्र म्हणून आलोय', नेमकं काय घडलं?
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Embed widget