Sharad Pawar on Raj Thackeray : शरद पवार म्हणातात, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा म्हणजे...
NCP Leader Sharad Pawar : दुसरीकडे कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
NCP Leader Sharad Pawar : कुणाचाही अयोध्या दौरा हा राष्ट्रीय पक्ष नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आज सकाळी कोल्हापुरात पत्रकार परिषेदत बोलताना शरद पवारांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केलं. तसेच, देशातील महागाईचे, बेरोजगारीचे प्रश्न योग्यरित्या सोडवले जात नाहीत, त्यामुळेच धार्मिक मुद्दे पुढे रेटले जात आहेत, असं म्हणत केंद्र सरकारलाही शरद पवारांनी टोला लगावला आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारल्यावर त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "कुणाचाही अयोध्या दौरा हा राष्ट्रीय प्रश्न नाही. कोण अयोध्येला जाणार आहे, ते मला माहित नाही. काल माध्यमांवरून मला माहिती मिळाली की, माझा नातूदेखील अयोध्येत आहे, हे मलाही माहीत नव्हतं."
"हनुमान चालीसा म्हणून काही होत नाही. सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला पडत आहेत. ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत, त्यांना प्रश्न सोडवता येत नाहीत. या सर्व मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी असले मुद्दे पुढे आणले जात आहेत. आज पेट्रोल आणि डिझेल याचे दर किती वाढले आहेत बघा. याबाबत लोकांनी चळवळ उभा केली पाहिजे.", असं पवार म्हणाले. तसेच, केंद्र सरकार विरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्याबाबतची प्रोसेस सुरू आहे, काँग्रेसचे देखील शिबीर सुरू आहे. आमच्या देखील बैठका सुरू आहेत, पण आमच्यात देखील मतभेद आहेत ते लवकर दूर केल्या पाहिजेत.", असंही शरद पवार म्हणाले.
केंद्र सरकार विरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं : शरद पवार
"हनुमान चालिसा म्हणून काही होत नाही. सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला पडत आहेत. ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत, त्यांना प्रश्न सोडवता येत नाहीत. या सर्व मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी असले मुद्दे पुढे आणले जात आहेत. आज पेट्रोल आणि डिझेल याचे दर किती वाढले आहेत बघा. याबाबत लोकांनी चळवळ उभा केली पाहिजे.", असं पवार म्हणाले. तसेच, केंद्र सरकार विरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्याबाबतची प्रोसेस सुरू आहे, काँग्रेसचे देखील शिबीर सुरू आहे. आमच्या देखील बैठका सुरू आहेत, पण आमच्यात देखील मतभेद आहेत ते लवकर दूर केल्या पाहिजेत.", असंही शरद पवार म्हणाले.
नावासाठी छोटी माणसं शरद पवारांवर टीका करतात ; अजित पवारांचा हल्लाबोल
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "महाराष्ट्रात काय प्रश्न आहेत हे महाविकास आघाडीने कामातून दाखवून दिले आहे. काही लोक जातीय तेढ निर्माण करत आहेत. अशा लोकांच्या नादाला लागू नका. पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे हे उगवतात. भोंगे या आगोदर दिसले नाहित का? जागरण गोंधळ आणि भजन किर्तन उशिरा असते. काकड आरती बंद झाली. कायदा सर्वांना सारखा आहे. नावासाठी छोटी माणसं शरद पवार यांच्यावर टीका करत असतात."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार? शरद पवार म्हणाले...