Kavathe mahankal result : रोहित पाटलांचा धमाका, विरोधकांचा सुपडासाफ, विरोधकांना 'बाप' दाखवला!
कवठे महंकाळ नगरपंचायतीत दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची एकहाती सत्ता आली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाने 10 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.
![Kavathe mahankal result : रोहित पाटलांचा धमाका, विरोधकांचा सुपडासाफ, विरोधकांना 'बाप' दाखवला! Ncp leader Rohit Patil group win in Kavathe Mahankal Nagar Panchayat Kavathe mahankal result : रोहित पाटलांचा धमाका, विरोधकांचा सुपडासाफ, विरोधकांना 'बाप' दाखवला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/6ea0506a7f31b32538d05b7a6b876dec_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kavathe mahankal result : अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या कवठे महंकाळ नगरपंचायतीत दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची एकहाती सत्ता आली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाने 10 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर त्यांच्या विरोधी गटाला म्हणजे शेतकरी विकास पॅनेलला 6 जागांवर विजय मिळवला आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेवार निवडूण आला आहे. या निवडणुकीनंतर सर्वांना आर आर पाटील यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य रोहित पाटील यांनी केले होते.
आबांचे स्वप्न पूर्ण झाले
कवठे महंकाळ नगरपंचायतीची निवडणूक लोकांनी हातात घेतली होती. सामान्य लोकांच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मी आभार मानत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रोहित पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. आज आबांची खूप आठवण येते. कवठे महंकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असावी हे आबांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न आज पूर्ण झाले असल्याचे रोहित पाटील यावेळी म्हणाले.
या निवडणुकीची खूप मोठी जबाबदारी होती. या निवडणुकीत सर्वसामान्य लोकांच प्रश्न समजून घेतले. आम्ही काही चुका केल्या नाहीत. आम्ही कायम लोकांच्यामध्ये होतो. त्यांचे प्रश्न समजून घेत होतो. प्रश्न सोडवतो होते. लोकांना आमच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या विश्वासाला आम्ही जागणार असल्याचे यावेळी रोहित पाटील यावेळी म्हणाले. आता कवठे मंहकाळमध्ये पहिले काम कोणते करणार असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, 70 ते 75 वर्षानपासून इथे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. तसेच काही प्रलंबीत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आबा असते तर त्यांनी खूप कौतुक केले असते. त्यांच्या दृष्टीने हे शहर खूप महत्त्वाचे होते. ते असते तर त्यांच्या इतका आनंद कोणालाही झाला नसता असे रोहित पाटील यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)