एक्स्प्लोर
Advertisement
राष्ट्रवादीच्या माजी आमदार धनराज महालेंची शिवसेनेत घरवापसी, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
धनराज महाले यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला पुन्हा एकदा झटका बसला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांची शिवसेनेत घरवापसी झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महालेंनी पुन्हा एकदा घड्याळाल रामराम करत शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधल आहे. आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धनराज महाले यांनी हाती शिवबंधन बांधलं. या पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला पुन्हा एकदा झटका बसला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी धनराज महाले यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करत राष्ट्रवादीकडून त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. याच कारणांमुळे खासदार भारती पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची वाट धरली होती. मात्र धनराज महाले यांना लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांच्याकडून दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळेचं महाले यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. तसेच ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वीचं राष्ट्रावादीचे नेते आणि माजी मंत्री सचिन आहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी पक्ष सोडताना फार आनंद होत नाही, मात्र काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement