सदाभाऊ खोत म्हणजे भाजपच्या फडात तुणतुणं घेऊन वाजवणारे ; अमोल मिटकरींचा टोला
भाजपच्या (BJP) फडात तुणतुणं हातात घेऊन वाजवणाऱ्याची भूमिका सध्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.
![सदाभाऊ खोत म्हणजे भाजपच्या फडात तुणतुणं घेऊन वाजवणारे ; अमोल मिटकरींचा टोला ncp leader amol mitkari reaction on sadabhau khot criticism सदाभाऊ खोत म्हणजे भाजपच्या फडात तुणतुणं घेऊन वाजवणारे ; अमोल मिटकरींचा टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/7b2d07e912af5a831196391734829725_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amol Mitkari On Sadabhau Khot : भाजपच्या फडात तुणतुणं हातात घेऊन वाजवणाऱ्याची भूमिका सध्या सदाभाऊ खोत यांची आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. काल सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे, असे वक्तव्य केलं होत. त्यांच्या या वक्तव्याला आज आमोल मिटकरी यांनी प्रत्यूतर दिले आहे.
डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी अमोल मिटकरी आले होते. यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली.
"मी शेतकरी कुटुंबातला साधा माणूस आहे. सदाभाऊ स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेतात. त्यांच्यावर टीका करण्याएवढा मी मोठा नाही, मात्र सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतुणं हाती घेतलेल्या माणसासारखी झाली आहे का? पिंजरा चित्रपटात ज्या गुरुजींनी तमाशाला विरोध केला आणि शेवटी त्यांनाच नाचावे लागलं तशी परिस्थिती सदाभाऊंची झाली आहे. भाजपच्या आगामी काळात सदाभाऊंची भाजपच्या फडामध्ये तुणतुणं हातात घेऊन वाजवणाऱ्याची भूमिका राहील असा टोला मिटकरी यांनी सदाभाऊंना लगावला.
राणा दाम्पत्यावर निशाणा
अमोल मिटकरी यांनी यावेळी राणा दाम्पत्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, "दलित असल्यामुळे मला चांगली वागणूक दिली नाही हा नवनीत राणा यांचा दावा खोटा आहे. कारण ज्या मतदार संघातून त्या अनुसूचित जाती जमातीचे नेतृत्व करतात ती कागदपत्रच खोटी आहेत. यावरून कोर्टाने त्यांना एकदा फटकारले देखील आहे. जेलमध्ये गेल्यावर त्यांना संविधान आणि दलित आहोत हे आठवतंय. परंतु, हे सर्व खोटं असून हा विरोधाभास आहे. राणा दाम्पत्याला पुढे करून महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांची बदनामी करण्याचं भाजपचं षडयंत्र फसलं आहे."
महत्वाच्या बातम्या
महाविकास आघाडीत शकुनीमामाचा सुळसुळाट ; सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
शरद पवारांनी आडनाव बदलून आगलावे ठेवावे; सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका
अमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर पुण्यात मोठा गोंधळ; ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)