AJit pawar and Sunetra Pawar : अजित पवार म्हणाले, लवकरच माझी पत्नी सुनेत्रा सुद्धा.....
60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांमध्ये माझा नंबर लागतो. त्यात काही दिवसांनी सुनेत्राचा देखील नंबर लागेल, असं म्हणत त्यांनी सुनेत्रा पावारांवर मिश्किल टिपण्णी केली आणि त्यानंतर सभागृहात हशा पिकला.
AJit pawar and Sunetra Pawar : विरोधीपक्ष नेते अजित पवार त्यांच्या मिश्किल टिपण्णसाठी चर्चेत असतात. आज मात्र त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावरच भर कार्यक्रमात मिश्किल टिपण्णी केली आहे. ते म्हणाले की, भारतात 13 टक्के लोक 60 वर्षापेक्षा जास्त वय आहे. म्हणजे 13 कोटी 50 लाख देशात वृद्ध आहेत. त्यात माझा नंबर लागतो. काही दिवसांनी सुनेत्राचा देखील नंबर लागेल. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता. मागील काही दिवस झाले अजित पवार भरतातील लोकसंख्येबाबत बोलत असतात. यावेळीदेखील त्यांनी लोकसंख्येला ( increasing Population In India) अनुसरुनच वक्तव्य केलं आहे.
बारामती ज्येष्ठ नागरी निवास भोजन कक्ष आणि करमणूक केंद्राचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. अजित पवारांनी सपत्नीक कॅरम खेळण्याचा आनंद घेतला. विरोधी पक्षनेते अजित हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे ज्येष्ठ नागरिक निवस्थामधील भोजन कक्ष आणि करमणूक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ नागरिक निवासमध्ये ज्येष्ठांकरिता कॅरमची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी अजित पवारांनी सपत्नीक कॅरमचा आनंद घेतला.
Ajit pawar and Sunetra Pawar : आई वडिलांची सेवा केली पाहिजे...
मुले मुली परदेशात असतात त्यांना घरी करमत नाही. घर खायला उठते म्हणून वृद्धाश्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. मातोश्री वृद्धाश्रम अशी संकल्पना युतीच्या काळात पुढे आली. आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे पण ज्यांची सोय होत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय असल्याचं ते म्हणाले.
लोखंडी सळईच्या भाले चोरले की 100 रुपये येतात अन् मग चपटी घेतात...
विरोधी पक्षनेते अजित पवार हे आठवड्यातून एकदातरी बारामतीतील विकासकामांची काळजीपूर्वक पाहणी करत असतात. एका पुलाच्या संरक्षक कठड्यावर लोखंडी सळईच्या भाल्याचे नक्षीकाम करण्यात आले होते. मात्र पाहणीत ते नक्षीकाम गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही कंपाऊंड केलं आहेत त्याचे लोखंडी सळईच्या भालेचोरले जातात. एक लोखंडी सळईचा भाला चोरला तर शंभर रुपये मिळतात. दोन बाटल्या दारूच्या येतात. आता चोरांनी देखील चोरता येणार नाही अशा काही गोष्टी करतो आहोत. जीवात जीव असेपर्यंत बारामतीकरांसाठी चांगलेच काम करेल.
संबंधित बातमी-