एक्स्प्लोर

चाळीस वर्षे भाजपची हमाली केली, मुख्यमंत्रीपदाची वेळ आल्यावर फडणवीसांना डोक्यावर बसवलं; एकनाथ खडसेंची खदखद पुन्हा बाहेर

Eknath Khadse: चाळीस वर्षे आपण भाजपमध्ये काम केलं पण मुख्यमंत्री पदाची वेळ आल्यानंतर आपल्याला डावलण्यात आल्याची खदखद एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. 

जळगाव: ज्या भारतीय जनता पक्षात चाळीस वर्षे हमाली केली, उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलं, त्या पक्षाने मुख्यमंत्रीपदाची वेळ आल्यावर देवेंद्र फडणवीसांना डोक्यावर बसवलं अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी आपली खदखद व्यक्त केली. नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदापर्यंत आला, पण त्यावेळी नावच वगळण्यात आल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे रेशन कार्ड वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले की, "भारतीय जनता पार्टीमध्ये चाळीस वर्ष हमाली केली, उभं आयुष्य पक्षासाठी घातलं. त्याच पक्षात नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदापर्यंत आला आणि नाथाभाऊचं नाव  वगळण्यात आलं. आपल्यावर अन्याय करण्यात आला."

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "मी मुख्यमंत्रीपदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला आणि मला मुख्यमंत्रीपदापासून डावलण्यात आलं."

एकनाथ खडसे म्हणाले की, "मुख्यमंत्री पदाचा अधिकार हा खान्देशाचा होता. स्वातंत्र्याला 70 वर्ष होऊन गेली, मात्र खान्देशावर सतत अन्याय करण्यात आला. गेल्या 70 वर्षात कोकणात नारायण राणे , मनोहर जोशी, बॅ. अंतुले असे तीन-तीन मुख्यमंत्री झाले. विदर्भात या आधी चार मुख्यमंत्री झाले आणि पाचवे देंवेंद्र झाले. मराठवाड्यातील  विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झालेत. मात्र नाशिक, नगर,जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर अधिकार असतानाही गेल्या सत्तर वर्षात एकदाही संधी देण्यात आली नाही. चाळीस-चाळीस वर्षे पक्षात आम्ही हमाली केली, पक्ष मोठा केला. देवेंद्र फडणवीसांसारख्यांना आम्ही घडवलं. मात्र आमचा अधिकार असतानाही मुख्यमंत्री पदापासून डावलण्यात आलं, सातत्याने अपमानित करण्यात आलं."

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

सत्ताधारी शेतकऱ्यांना उध्वस्त करतायेत, फायनान्सवाले आले तर पैसे नाहीत म्हणायचं, जरांगे पाटलांचा हल्लाबोल
सत्ताधारी शेतकऱ्यांना उध्वस्त करतायेत, फायनान्सवाले आले तर पैसे नाहीत म्हणायचं, जरांगे पाटलांचा हल्लाबोल
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
Solapur : ऊसदराची बैठक आज रात्रीच! कंडका पडणार का? तोडगा न निघाल्यास बेमुदत रेल रोको ते महामार्ग बंद, राजू शेट्टींचा इशारा
ऊसदराची बैठक आज रात्रीच! कंडका पडणार का? तोडगा न निघाल्यास बेमुदत रेल रोको ते महामार्ग बंद, राजू शेट्टींचा इशारा

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Shivendraraje Bhonsle : सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले वरिष्ठांची सूचना मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगितलेली..
सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, वरिष्ठांच्या सूचना...
Embed widget