एक्स्प्लोर

संजय राऊतांच्या गृहमंत्र्यांबाबत 'रोखठोक'चा अजित दादांकडून समाचार, म्हणाले, 'मिठाचा खडा टाकू नये', 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले असल्याचं 'रोखठोक' या सदरात लिहिलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊतांच्या या मतावर टीका केली आहे.  

बारामती :   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले. यावरुन विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुख यांच्या 'रोखठोक' टीका केली आहे. संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून लिहिलं आहे की, देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. यावरुन आता राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊतांच्या या मतावर टीका केली आहे.  

'अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले', संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

अजित पवार म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे सरकार महाविकास आघाडी म्हणून काम करते आहे. या सरकारमध्ये कोणाला मंत्री करायचे, हा त्या त्या पक्षाचा व पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे. सरकार व्यवस्थित चालू असताना इतरांनी, विशेषतः या तीन पक्षांमध्ये असलेल्या कुणीही त्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये, असं अजित पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे सर्वोच्च नेते आहेत. ते पक्षातील कोणत्या नेत्याला मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या पक्षातील कोणत्या नेत्यास मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तोच प्रकार काँग्रेसमध्ये देखील आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणाला मंत्री करायचे हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे. यापूर्वी देखील काँग्रेसमध्ये असताना पवार साहेबांनी सुधाकरराव नाईक असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या देताना भूमिका पार पाडली होती. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालू असताना कुणी यामध्ये मिठाचा खडा टाकू नये असे पवार म्हणाले.

संजय राऊत यांनी काय लिहिलं  

संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून लिहिलं आहे की, देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. राऊतांनी म्हटलं आहे की, या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय की, अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल? असा सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; आजपासून सुरुवात
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; आजपासून सुरुवात
Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Embed widget