एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फटाके फोडून नक्षलवाद्यांना सतर्क, लहान मुलांनी जवानांची डोकेदुखी वाढवली
गडचिरोलीत लहान मुलं नक्षल विरोधी अभियानाच्या जवानांची डोकेदुखी वाढवत आहेत.लहान मुलं नक्षल्यांच्या कॅम्पची सुरक्षा भिंत बनत आहेत. ते त्यांच्या इंटेलिजन्सचं काम करत आहेत. ही मुलं फटाके फोडून नक्षलवाद्यांना जवानांपासून सतर्क करतात.
गडचिरोली : खोटी आश्वासनं आणि आमिषं दाखवून लहान मुलांना नक्षलवादी संघटनेत सामील करुन घेण्याचा प्रकार आता नवीन नाही. परंतु छत्तीसगड, झारखंडसह महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात, नक्षलविरोधी अभियानाला येणाऱ्या जवानांची दिशाभूल करण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. 'बाल संगम' असं या लहान मुलांच्या संघटनेचं नाव आहे. राज्याच्या अनेक अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त जिल्ह्यातील नक्षलविरोधी पोलीस कमांडो जेव्हा अँटी नक्षल ऑपरेशनसाठी घनदाट जंगलात जातात, त्यावेळी या मुलांचा वापर होतो.
अशी करतात दिशाभूल!
घटदाट जंगलात नक्षली कॅम्प किंवा नक्षल्यांची तुकडी असते, त्याच्या चारही बाजूला मुलं आपलं काम करत असतात. अभियानादरम्यान जवान जवळ येताच, ही लहान मुलं फटाके फोडतात. त्यामुळे ऑपरेशनवर असलेले पोलिस, कमांडोंचं लक्ष विचलित होतं. जवानांनी नक्षल्यांच्या दिशेने न जाता दुसऱ्या दिशेने जावं आणि नक्षल दल किंवा त्या भागात असलेल्या नक्षल्यांना जवान आल्याची सूचना मिळून ते सुरक्षितस्थळी जावेत, हा यामागचा उद्देश असतो.
इंटेलिजन्सचं काम कसं करतात?
पोलिस कॅम्प, पोलिस मुख्यालय अशा ठिकाणी ही लहान मुलं पोलिसांच्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेऊन असतात. ज्यावेळी नक्षलविरोधी अभियानातील पथक कॅम्पबाहेर पडतं, तेव्हा ही मुलं याची माहिती नक्षल्यांना देण्याचं काम करतात. लहान मुलं असल्याने या मुलांकडे सहज कोणीही लक्ष देत नाही. याचाच फायदा नक्षली घेतात आणि ते या मुलांचा वापर करतात.
याबद्दल पोलिसांना माहित नाही का? असा प्रश्न पडला असेलच. पण फटाके कोण फोडत आहेत, का फोडत आहेत हे पोलिसांनाही माहीत आहे. मात्र फटाके फोडणारी मुलं लहान असल्याने ते पोलिस काही करु शकत नाहीत. कारण कायद्याने त्यांचे हात बांधले आहेत. शेवटी ती मुले लहान आहेत. महत्त्वाचं म्हणजे जवान त्या मुलांना पाहू शकतात, इतक्या अंतरावर ही लहान मुलं कृत्य करत असतात.
कशी तयार होते 'बाल संगम टीम'?
सगळ्यात आदी नक्षलवादी संघटना असं गाव निवडतात जिथे संपूर्ण गाव नक्षल समर्थक असतं आणि नक्षलवाद्यांना ते मानतात. पोलिसांशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही, अशा मुलांची ते निवड करतात. एकतर त्यांना बंदुकीचं आकर्षण दाखवलं जातं, नक्षली चळवळबद्दल खोटी माहिती देऊन आमिष दिलं जातं आणि जबरदस्तीने घेऊन जातात. यात 10 ते 15 वर्ष वयाची मुलं असतात. त्यानंतर नक्षली मुलांना आपल्याबरोबर घेऊन जातात. त्यांना चांगलं शिक्षण देण्याची आश्वासनं दिली जातात, मात्र अस काहीही होत नसतं.
छत्तीसगडच्या अबुजमाडमध्ये प्रशिक्षण
नक्षलवाद्यांचा गड समजला जाणाऱ्या छत्तीसगडच्या अबुजमाडमध्ये या मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. तिथे एका शिबिरात कोणत्याही दबावाशिवाय, आपल्या मर्जीने राहू दिलं जातं. कधी नक्षल चळवळीचं पुस्तक वाचायला दिलं जातं तर कधी बंदुकीचं आकर्षण दाखवलं जातं.
जवानांची दिशाभूल कशी करायची याचं प्राथमिक शिक्षण त्यांना दिलं जातं. मुलं थोडी मोठी झाली की त्यांना बंदुकीचं प्रशिक्षण, दारुगोळा बनवण्याचं प्रशिक्षण, स्फोट घडवण्याचं प्रशिक्षण, दिलं जातं. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना वेगवेगळ्या दलात जबाबदारी दिली जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement