गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत नक्षल कमांडर किशोर कवडो याला ताब्यात घेतलं आहे. किशोरवर 16 लाखांचे बक्षीस होते. विशेष म्हणजे किशोरला ताब्यात घेताना गडचिरोली पोलिसांचा संवेदनशील चेहरा देखील समोर आला आहे. 29 मार्च रोजी पोलिसांनी धडाकेबाज अभियान राबवत खोब्रामेंढा चकमकीत 5 मोठ्या नक्षल्यांना टिपले होते. मात्र या यशस्वी कामगिरीत नक्षलवाद्यांनी आपल्या काही साथीदारांना जखमी अवस्थेत सोडून पळ काढल्याचे पुढे आले होते. माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आसपासच्या गावांमध्ये शोध अभियान राबविले. यात टीपागड दलमचा  उपकमांडर किशोर कवडो याला शोधण्यात पोलिसांना यश आले. कटेझरी गावातील कट्टर नक्षल समर्थकांच्या घरी पायाला गोळी लागलेल्या जखमी अवस्थेत किशोर कवडो लपला होता. 


Rakeshwar Singh Released: नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या जवानाची सहा दिवसांनी सुटका


पोलीस दलाने गावाला घेराव घालत किशोर याला ताब्यात घेत प्राथमिक उपचारानंतर नागपुरात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. उत्तम उपचारानंतर आता किशोरची प्रकृती सुधारली आहे. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


Chhattisgarh Naxal Attack: बीजापूर नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड कमांडर हिडमा असल्याचं स्पष्ट


पोलिसांनी नक्षल समर्थक गणेश कोल्हे याला या प्रकरणात अटक केली आहे. जखमी नक्षली किशोर कवडो याच्यावर 16 लाखांचे बक्षीस होते. विविध नक्षल गुन्हे, जाळपोळ प्रकरणात पोलिसांना किशोर हवा होता. छत्तीसगडच्या बीजापूर येथे प्रचंड दबावानंतर का होईना नक्षल्यांनी कोब्रा कमांडो राकेश मनहास याला कुठलीही इजा न करता सोडले होते. आता जखमी नक्षलवाद्याला अतिदक्षता कक्षात पोलिस पाणी पाजत असल्याचा व्हिडीओ पुढे आल्याने पोलिसांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे. 


महत्वाच्या बातम्या : 


Chhattisgarh Maoist Attack | बिजापूर चकमक हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश नाही, नक्षलविरोधी अभियान सुरुच राहणार : मुख्यमंत्री बघेल


chhattisgarh naxal attack | जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, नक्षलवादी हल्ल्याचा अमित शाह यांच्याकडून निषेध