रायपूर : नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह मनहासला सोडलं आहे. राकेश्वर सिंहला रुग्णवाहिकेतून विजापूर येथे आणण्यात आले आहे. राकेश्वर यांच्या सुटकेनंतर कुटुंबियांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. एबीपी न्यूजशी बोलताना राकेश्वर सिंह यांच्या पत्नी यांनी मीडिया आणि सरकारचे आभार मानले.
राकेश्वर मनहास यांचं 3 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी अपहरण केलं होतं, त्यानंतर 6 दिवसांनी त्यांना सोडलं आहे. त्यांना सरकारने गठीत केलेल्या 2 सदस्यीय मध्यस्थ पथकाच्या स्वाधीन केलं. यावेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पद्मश्री धर्मपाल सैनी आणि गोंडवाना समाज अध्यक्ष तेलम बोरैया हे या पथकात होते. जवानासह सर्व जण आता बासागुडा येथे पोहोचणार आहेत.
Chhattisgarh Naxal Attack: हल्ल्यात 28 हून अधिक नक्षलवादी ठार, सीआरपीएफच्या डीजींचा दावा
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 22 जवान शहीद
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर 3 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले होते. तर इतर 31 जवान जखमी झाले आहेत. यंदाच्या वर्षातील नक्षलवाद्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. ही घटना घडायच्या आधी हिडमा टेकुलगुडा आणि जुनागुडा गावाच्या जवळ असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. नक्षलींच्या मिलिटरी बटालियनचा मुख्य कमांडर त्या भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी एकत्रित मोहीम राबवून हिडमाला जेरबंद करण्याची योजना आखली होती. त्यासाठीच सीआरपीएफ, बीजपुर पोलिसांचे डीआरजी युनिट तसेच एसटीएफचे शेकडो जवान बीजपुर आणि सुकमा जिल्ह्यातून टेकुलगुडा आणि जुनागुडा च्या दिशेने निघाले होते.
Chhattisgarh Naxal Attack: बीजापूर नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड कमांडर हिडमा असल्याचं स्पष्ट
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवादी हल्ल्याबाबत सीआरपीएफचे डीजी कुलदीप सिंग यांनी मोठा दावा केला आहे. कुलदीप सिंग म्हणाले आहेत की या हल्ल्यात 28 पेक्षा जास्त नक्षलवादी ठार झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हा हिडमा नावाचा नक्षलवादी कमांडर असल्याचं स्पष्ट झालंय.