Navneet Rana News : ...तर ठाकरे पिता-पुत्र जेलमध्ये जातील; असे का म्हणाल्या नवनीत राणा?
उद्धव ठाकरे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशनात सहभागी झाले आहेत. ठाकरेंनी विदर्भातील 10 मोठे काम सांगितले, तर माझ्या खासदारकीचा पाच वर्षाचा पगार मी संजय राऊत यांना देईल: नवनीत राणा
Navneet Rana on Uddhav Thackeray and Aditya Thackeray : "राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारमुळेच विदर्भात हिवाळी अधिवेशन होत आहे. यामध्ये अनेक लोक बॉम्ब फोडणार असल्याची धमकी देत आहे. मात्र त्यांचे फटाके फुसके असून देवेंद्र फडणवीस यांनी लवंगी बॉम्ब फोडला तरी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जेल मध्ये जातील," अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. दोन वर्षांनंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. यानिमित्त आपण बरेच बॉम्ब फोडणार असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
"विदर्भाच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते. विदर्भाच्या अनेक प्रश्नांकडे जाणून दुर्लक्ष करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशनात सहभागी झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील 10 मोठे काम सांगितले तर माझ्या खासदारकीचा पाच वर्षाचा पगार मी संजय राऊत यांना देईन," असा टोलाही नवनीत राणा पुढे यांनी लागावला.
अधिवेशनात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत, त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, "जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी अधिवेशन होत असते. यामध्ये नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावायचे असतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विकासासंदर्भात सादर केलेले प्रपोजल तोंडपाठ असतात. मात्र उद्धव ठाकरे यांना जनतेच्या मुद्द्यांची माहितीच नाही आहे. राज्याच्या विकासासाठी, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशन असते. मात्र विरोधकांकडून जनतेच्या पैशातून घेण्यात येणारे अधिवेशन आरोप प्रत्यारोप करुन वेळ घालवण्यात येत असल्याची टीकाही यावेळी राणा यांनी केली'.
... तर यांना महागात पडेल
यावेळी मंत्र्यांकडून अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले असून त्यांच्यावर घोटाळे आणि गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात येत आहे. यावर प्रश्न विचारले असता नवनीत राणा म्हणाल्या, "चुका प्रत्येकाकडून होत असतात. त्यामुळे चूक केली म्हणजे त्याला राजीनामा मागणे किंवा सतत त्यावर चर्चा करणे होत नाही. चुका प्रत्येकाकडून होत असतात. आता प्रत्येकाच्या चुका पकडण्याचे सत्र सुरु केल्यास सध्या विरोधात असलेल्या प्रत्येकाला महागात जाईल." उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकांची कामे मार्गी लावण्यात इंटरेस्ट आहे. त्यांनी घेतलेले महामार्ग, मेट्रो, आरोग्य विभागातील कामांमध्ये व्हिजीन दिसून येत असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या.
ही बातमी देखील वाचा