एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई-गोवा हायवेवर खड्ड्याचा बळी, बाईकस्वार महिलेचा मृत्यू
रुंदीकरणाचं काम रखडल्यामुळे रस्त्यावर खडी पसरली होती. या खडीवरुन महिलेची दुचाकी घसरली आणि खाली पडली.
नवी मुंबई : खड्ड्यांमुळे आणखी एका बाईकस्वार महिलेला प्राण गमवावे लागल्याची घटना घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळ्याजवळ हा अपघात घडला. या घटनेच्या निषेधार्थ मुंबई-गोवा हायवेवर कर्नाळ्याजवळ गावकऱ्यांनी रास्तारोको केला आहे.
पनवेलच्या दिशेनं अॅव्हेंजर बाईकवरुन जाताना महिलेला अपघात झाला. मुंबई-गोवा हायवेवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यातच रुंदीकरणाचं काम रखडल्यामुळे रस्त्यावर खडी पसरली होती. या खडीवरुन महिलेची दुचाकी घसरली आणि खाली पडली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरखाली तिचं डोकं चिरडलं गेलं.
या दुर्घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रेलरसह चालकानं तिथून पळ काढला आहे. संतप्त
गावकऱ्यांनी मुंबई-गोवा हायवेवर कर्नाळ्याजवळ रास्तारोको केला आहे.
महिलांना बळ देणाऱ्या लेडी रायडरचा खड्ड्यामुळे करुण अंत
जुलै महिन्यातच लेडी बायकर जागृती होगाळेचा मुंबई-अहमदाबाद मार्गावर वेती गावाजवळ अपघाती मृृत्यू झाला होता. तिची 350 सीसी रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड खड्ड्यात आदळली. त्यामुळे ती खाली पडली आणि ट्रकखाली चिरडून गंभीर जखमी झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement