एक्स्प्लोर

राष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळची अटक टळली, अटकपूर्व जामीन मंजूर

दत्तू भोकनळ विरोधात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात दत्तूची पत्नी असा दावा करणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार शारीरिक-मानसिक त्रास तसेच फसवणूक केल्याप्रकरणी 16 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक : राष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ याचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केला असून दत्तूची अटक त्यामुळे तुर्तास टळली आहे. मात्र त्याच्या जामीन अर्जावर अद्याप निर्णय बाकी असून 29 मे रोजी त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

लष्करी जवान तसेच नॅशनल रोइंगपटू आणि 'गोल्डमॅन' अशी ओळख असलेल्या दत्तू भोकनळ विरोधात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात दत्तूची पत्नी असा दावा करणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार शारीरिक-मानसिक त्रास तसेच फसवणूक केल्याप्रकरणी 16 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, "2015 मध्ये दत्तूला आर्मीमध्ये मेडल मिळाल्याने चांदवडमध्ये गावकऱ्यांनी त्याचा सत्कार ठेवला होता. तेव्हा त्याची आणि माझी ओळख होऊन मैत्री झाली. काही दिवसांनी मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही दोघांनी डिसेंबर 2017 मध्ये पुण्याच्या आळंदीला जाऊन एका कार्यालयात हिंदू पद्धतीने लग्न केलं. मात्र याबाबत कुठेही वाच्यता न करता काही दिवसांनी दोघांकडच्या नातेवाईकांसमक्ष गावी लग्न करायचं आम्ही ठरवलं.

मात्र त्यानंतर आम्ही लग्न करणार असं आमच्या घरी सांगितलं. दोन वेळा लग्नाची तारीख ठरवून कार्यालय बुक करुनही, दत्तूने ऐनवेळी नकार दिला. त्याने मला 22 डिसेंबर 2017  ते 3 मार्च 2019 या काळात शारीरिक आणि मानसिक त्रास देत माझी फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे लग्नाबाबत विचारल्यास मी विष पिऊन आत्महत्या करेन, अशी धमकीही दत्तूने मला दिली.", असे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही सर्व तक्रार खोटी असून या महिलेचे आरोप दत्तूने फेटाळून लावले आहेत. आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडू असंही त्यांनी सांगितलं होतं.

कोण आहे दत्तू भोकनळ?

- दत्तू भोकनळ हा मूळचा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव-रोही या गावचा आहे. - सैन्यात भरती झाल्यावर त्याने रोईंगला सुरुवात केली - रोईंगमध्ये प्राविण्य मिळवत 2016 चं रिओ ऑलिम्पिक गाठलं - रिओ ऑलिम्पिकमध्ये दत्तूने रोईंगच्या सिंगल स्कल्स प्रकारात गटात 6 मिनिटं आणि 54.96 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून तेरावं स्थान मिळवलं होतं. - ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा दत्तू महाराष्ट्रातला पहिलाच रोईंगपटू ठरला. - दत्तू भोकनळचा समावेश असलेल्या भारताच्या रोईंग चमूने 18व्या एशियाड गेम्समधील पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Embed widget