एक्स्प्लोर
पत्नी आणि सासरच्यांकडून छळ, नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या
नाशिक : पत्नी आणि सासरच्यांच्या जाचाला कंटाळून ओझरमधल्या एचएएलच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष पवार असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.
कायदे महिलांकडून आहेत म्हणून कुणाचा जीव घेऊ नका, अशी विनवणी संतोषने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांकडेही मदत मागितली. मात्र पोलीसांनी दुर्लक्ष केलं. उलट आईलाही शिवागाळ करण्यात आली. सासरच्यांनी अनेक वेळा मारहाण केली, मानसिक छळ केला, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं संतोषने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान याप्रकरणी पत्नी आणि सासऱ्यासह चौघांवर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement