ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या- संभाजी राजे
EWS आरक्षण घेतल्याने समाजाला धोका होणार नाही हे सरकारने सांगावं, असं म्हणत त्यांनी आग्रही भूमिका मांडली. EWS घेतल्याने SEBS ला धोका निर्माण होईल, असंही ते म्हणाले...

नाशिक : मराठा समाजानं पहिल्या दिवसापासूनच सामाजिक मागास सिद्ध केला आहे, असं म्हणत मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजी राजे छत्रपती य़ांनी पुन्हा त्यांची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण, EWS आरक्षण घेतल्याने समाजाला धोका होणार नाही हे सरकारने सांगावं, असं म्हणत त्यांनी आग्रही भूमिका मांडली.
EWS घेतल्याने SEBS ला धोका निर्माण होईल. किंबहुना EWS आरक्षण सर्व खुल्या वर्गासाठी आहे ते फक्त मराठा समाजासाठी नाही, असं म्हणत त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत न्यायालयाकडून चांगला निर्णय अपेक्षित असल्याचं म्हटलं.
शिवाय, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या obc समाजात भीती निर्माण झाली आहे हे खरं. मात्र, obc ला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करताना ते दिसले. यावेळी पंतप्रधानांच्या भेटीसाठीही त्यांना आशा व्यक्त केल्या. पण, पंतप्रधान यांच्या भेटीची मी आज देखील वाट पाहतोय, अजून वेळ मिळाला नाही असं म्हणताना त्यांनी निराशेचाही सूर आळवला. शिवाय दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर प्रकाशझोत टाकत शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने मार्गी काढावेत अशीही मागणी केली.
महाराष्ट्र दिनी चित्रपटगृहांतून खळखळून वाहणार 'गोदावरी'
आधी किल्ल्यांचं जतन करा...
आरक्षणाचा मुद्दा जसा राज्याच्या राजकारणात उचलून धरला जात आहे, त्याप्रमाणं मागील काही दिवसांपासून शिवस्मारकाच्याही बऱ्याच चर्चांनी जोर धरला आहे. पण, शिवस्मारकापूर्वी प्राथमिक जबाबदारीनं आधी किल्ल्यांचं जतन केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. शिवाय शिवस्मारकाची जागा का बदलली गेली, असा सवालही त्यांनी केला. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या भागात असणाऱ्या किल्ल्यांचा आढावा घेत सर्वाधिक किल्ले नाशिकनमध्ये असूनही ते दुर्लक्षित असल्याची खंत व्यक्त केली.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या





















