नाशिक : जिल्ह्यातील सप्तशृंगी गडाजवळील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तसेच 12 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
नाशिक कळवण रस्त्यावरील मार्कंडेय पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारी परिसरात हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण आहे की, दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला आहे. दोन ट्रॉली मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर उताराला असतांना अचानक ब्रेक फेल झाल्याने थेट पुढील कारवर जाऊन उलटला. या भीषण अपघातात सहा जण ठार झाले असून 12 ते 15 जखमी झाले आहेत.
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले सर्वजण जळगाव येथील मजूर असल्याचे समजते. दरम्यान कारचाकाला ट्रॅक्टर उलटत असल्याचा अंदाज आल्याने कारमधील प्रवाशी उतरून बाहेर पडले. अपघात एवढा भीषण होता की कारचा चेंदामेंदा होऊन ट्रॅक्टर वरील अनेकजण दरीत फेकले गेले. तर अनेकजण ट्रॉली खाली आले. यात मजुरांचा संसार देखील रस्त्यावर फेकला गेला.
दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मृतांची नावे समजू शकले नाही. तर जखमींना प्रथम वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रॅक्त्रर मधील जखमी प्रवाशांना स्थानिक गावकरी आणि वणी पोलिसांच्या मदतीने वणी ग्रामीण रुग्णालयात तसेच काहींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक देखिल थांबवण्यात आली होती. पोलिसांकडून अपघाताबाबत अधिक तपास सध्या सुरु असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली अपघातांची संख्या ही चिंताजनक आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Minister Jayant Patil : नाशिक जिल्ह्यातील किकवी, गोदावरी पेयजल प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, मंत्री जयंत पाटील यांची माहिती
- Nashik News : नाशिकमध्ये फिरते पशुवैद्यकीय युनिट जनावरांना ठरतेय वरदान, अशी आहे हेल्पलाईन
- Nashik Godawari : गोदामाईत आढळले गटार मिश्रित पाणी, मनपा आयुक्त रमेश पवार स्वतः उतरले नदी पात्रात