Praniti Shinde Vs Navneet Rana :  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हनुमान चालीसेचा 'भोंगा' हायजॅक करून शिवसेनेची डोकेदुखी वाढवलेल्या खासदार नवनीत राणा यांची राजकीय कोंडी करण्याच्या दिशेने  पाऊले टाकली जात आहेत का ? याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरु होण्याचे कारण म्हणजे काँग्रेसच्या शिर्डीमधील चिंतन शिबिरात सादर करण्यात आलेल्या एका पत्राने.


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना येणाऱ्या 2024 मधील लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी द्यावी असं थेट पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी दिलं आहे.आता या पत्रावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


शिर्डीमध्ये काँग्रेसचे दोनदिवसीय चिंतन शिबिर सुरू आहे. याच शिबिरात काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणांविरोधात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली.तस पत्रच त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रणिती शिंदे यांना दिलं. आतापासून तयारी केल्यास 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा खासदार निवडून येऊ शकतो, असा दावाही  नंदकिशोर कुयटे यांनी केला आहे.  


नवनीत राणा आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आणि भाजपच्या जवळ गेल्या 


2019 च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडणूक लढवली आणि जिंकून आल्या. मात्र, आता नवनीत राणा भाजपच्या जवळ गेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर आहे.  खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून एक वेगळेच वळण जिल्ह्याला देण्याचे काम केलेले आहे.


यामुळे मतदारसंघात लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाल्याचे पत्रात म्हटले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये पुर्ण बहुजन समाज एकवटला आहे,याच संधीचा फायदा घेऊन अमरावती लोकसभा 2024 निवडणुकीची आतापासून तयारी केल्यास एक कर्तृत्ववान महिला म्हणून अभ्यासू,सुशिक्षित आणि जनतेशी नाळ असणारी आमदार प्रणिती शिंदे उत्तम पर्याय ठरू शकतात, असेही पत्रात म्हटलं आहे 


प्रणिती शिंदे अमरावतीमधून लढल्यास नवनीत राणा यांची चांगलीच अडचण निर्माण होऊ शकते, असं जिल्ह्यात सध्या बोलले जात आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या