नाशिक : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत राज्यातील एक कोटी 57 लाख ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) संच वाटप करण्यात असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यात नाशिक (Nashik) जिल्ह्यातील साधारण सात लाख 78 हजार लाभार्थ्यांना शिधा संच वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला आनंदाचा शिधा मिळेल, त्यापासून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही, असे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. 


राज्य सरकारने शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यात येतो. मागील दिवाळीपासून (Diwali) या योजनेला राज्यात सुरवात झाली आहे. या योजनेत अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट होणाऱ्या आणि केशरी, पिवळ्य़ा रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येतो. आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी (Gauri Ganpati) आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. तसेच दिवाळीमध्ये देखील 100 रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत दोनदा हा शिधा मिळणार आहे. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा संच असेल, राज्यातील एक कोटी 57 लाख तर नाशिक जिल्ह्यातील सात लाख 78 हजार लाभार्थ्यांना शिधा संच वाटपाचा लाभ मिळणार आहे. 


येवला (Yeola) येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एक कोटी 57 लाख लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा संचाचे वाटप होणार असून त्याचा राज्यातील साधारण साडेसात कोटी जनतेला लाभ होणार आहे. जिल्ह्यातील साधारण सात लाख 78 हजार लाभार्थ्यांना शिधा संच वाटप करण्यात येणार आहे. या आनंदाचा शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार शिधा जिन्नसांचा समावेश आहे. हा संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपयांत वितरित केला जाणार आहे. राज्यातील गोर गरीब जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून या आनंदाचा शिधाच्या माध्यमातून गोरगरिबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे.


येवल्यात 500 नवीन रेशन कार्डचेही वाटप


अंत्योदय अन्न योजना आणि केशरी तसेच पिवळय़ा रंगाचे (प्राधान्य कुटुंब) शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती महसुली विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्रय़ रेषेवरील (एपीएल) शिधापत्रिकाधारकांना हा संच देण्यात येईल. तसेच येवला तालुक्यात 140 स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील, पिवळे, केसरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा संचांचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी 500 नवीन रेशन कार्डचेही वाटप करण्यात आले. येवला तालुक्यातील अंत्योदय योजनेतून 9 हजार 586 व प्राधान्य योजनेतून 28 हजार 414 अशा साधारण 38 हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होणार आहे, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले. 


इतर महत्वाची बातमी : 


Cabinet Decision: गौरी गणपती आणि दिवाळीत मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय