Rajkumar Rao On Kalavantancha Ganesh : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) सध्या चर्चेत आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) आला असून भारतभर मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होणार आहे. बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावही (Rajkumar Rao) यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणार आहे. 


पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींचादेखील भर असतो. राजकुमार रावदेखील यात मागे नाही. तो दरवर्षी पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचा विचार करून हा सण खास पद्धतीने साजरा करतो. टिकाऊ साहित्य वापरून गणपतीच्या मूर्ती तयार करून तो हा सण साजरा करणार असल्याचं समोर आलं आहे. या कृतीत पर्यावरणाशी असलेली त्याची बांधिलकीदेखील दिसून येते.



राजकुमार राव पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणार


राजकुमार रावने शहनाज गिलला दिलेल्या मुलाखतीत आपला दृष्टिकोन मांडला आहे. अभिनेता म्हणाला,"मी दरवर्षी स्वतःच्या हाताने गव्हाच्या पिठाने गणपतीची मूर्ती बनवतो. खूप मजा येते. मी राजमा-बीन्स वापरून डोळे बनवतो आणि मसूर आणि इतर डाळी वापरून दागिने बनवतो. मग मी त्यांना हळदीचा वापर करून रंग देतो आणि हे करण्यात एक वेगळ सुख आहे". 


बायोडिग्रेडेबल मटेरियल आणि नैसर्गिक रंग वापरून राजकुमार राव अनोख्या पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतो.राजकुमार रावचे पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती बनवणं हे चाहत्यांना एक प्रेरणा देऊन जाणार आहे.


राजकुमार रावबद्दल जाणून घ्या... (Who Is Rajkumar Rao)


राजकुमार राव हा लोकप्रिय अभिनेता आहे. क्वीन, बरेली की बर्फी, हम दो हमारे दो, अलीगढ, लुडो, छलांग अशा अनेक सुपरहिट सिनेमांत त्याने काम केलं आहे. 'द व्हाईट टायगर' या सिनेमातील त्याच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. त्याच्या 'स्त्री' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 






मनोज बाजपेयी यांच्या अभिनयाने प्रेरित होऊन राजकुमार रावने अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. 2010 पासून राजकुमार आणि पत्रलेखा एकमेकांना डेट करत होते. अखेर 15 नोव्हेंबर 2021 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. आजवर अभिनेत्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 


संबंधित बातम्या


Sayali Sanjeev : वडिलांच्या आजारपणात बाप्पाकडून सकारात्मक ऊर्जा मिळाली; अभिनेत्री सायली संजीवच्या पाठीशी गणराया