Reliance AGM Meet 2022 Live Updates : दिवाळीपासून जिओ 5G इंटरनेट सुरू होणार, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, वाचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Reliance AGM Meet 2022 Live Updates : मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स 5G इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Aug 2022 03:21 PM
जिओ 5 जी (Jio 5G) 5G इंटरनेट सेवेची नवीन आवृत्ती लाँच करणार 

जिओ 5 जी (Jio 5G) 5G इंटरनेट सेवेची नवीन आवृत्ती लाँच करणार आहे. आम्ही सर्व जागतिक स्मार्टफोनसोबत काम करत आहोत, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे. जिओ 5जी ही देशातील सर्वात प्रगत 5G सेवा असेल.

रिलायन्स जिओचा स्वस्तातील 5G मोबाईल 'असा' असणार

रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली. त्याशिवाय, रिलायन्सकडून देशातील स्वस्तातील 5G स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. या स्वस्त दरातील स्मार्टफोनसाठी रिलायन्सने जगातील दिग्गज आयटी कंपन्यांसोबत भागिदारी केली आहे. रिलायन्स सगळ्यात स्वस्तातील 5G स्मार्टफोन लाँच करणार असल्याची चर्चा होती. या स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचे म्हटले जात आहे. या स्वस्तातील मोबाईलची वैशिष्ट्ये कसे असतील याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जगातील सर्वात प्रगत 5G सेवा देणार

जिओ 5जी (Jio 5G) जगातील सर्वात प्रगत 5G सेवा असेल, असा दावा मुकेश अंबानी यांनी केला आहे. दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह अनेक शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू होईल. त्यानंतर दर महिन्याला त्याचा विस्तार केला जाईल. डिसेंबर 2023 पर्यंत, Jio 5G देशातील प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आणि प्रत्येक तहसीलपर्यंत पोहोचेल.

जिओ 5G देणार सर्वात स्वस्त डेटा

अंबानी यांनी दावा केला की जिओ 5G इंटरनेट सर्वांना जोडेल आणि देशातील प्रत्येक गोष्ट कनेक्ट करेल. जिओ 5G सेवा सर्वोत्तम आणि सर्वात स्वस्त डेटा देईल. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच जगभरातील डिजिटल गरजाही पूर्ण होतील. 

डिसेंबर 2023 पर्यंत जिओ 5G सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल

दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह अनेक शहरांमध्ये जिओ 5G इंटरनेट सेवा सुरू होईल. डिसेंबर 2023 पर्यंत जिओ 5G सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे.

दिवाळीपासून जिओ 5G इंटरनेट सुरू होणार

रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. पहिल्या टप्प्यातील जिओ 5 G इंटरनेट सेवा दिल्ली, मुंबईत सुरू होणार असून पुढील वर्षापर्यंत देशभरात इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. रिलायन्स जिओ 5 जीमुळे देशात मोठा बदल होणार असून डिजिटलायझेशनला मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. 

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

पार्श्वभूमी

Reliance AGM 2022 : रिलायन्स जिओ 5जी इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. पहिल्या टप्प्यातील जिओ 5 G इंटरनेट सेवा दिल्ली, मुंबईत सुरू होणार असून पुढील वर्षापर्यंत देशभरात इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. रिलायन्स जिओ 5 जीमुळे देशात मोठा बदल होणार असून डिजिटलायझेशनला मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. 

आज रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारणसभा (AGM) पार पडली आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या बैठकीत मोठ्या घोषणा केली आहे. रिलायन्स 5 जी इंटरनेट सेवेचा शुभारंभाची (Reliance 5G Internet)  घोषणा केली आहे. 

दिवाळीपासून 5 जी सेवा सुरू होणार

रिलायन्स जिओने 5 जी स्पेक्ट्रमच्या लीलावात बाजी मारली आहे. रिलायन्स जिओला देशातील सर्वाधिक सर्कलमध्ये 5 जी स्पेक्ट्रम मिळालं आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर दरात मोठी उसळण दिसून आली आहे. आजच्या सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी जिओच्या 5 जी बाबतील मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली आहे.

जगातील सर्वात प्रगत 5G सेवा देणार

जिओ 5जी (Jio 5G) जगातील सर्वात प्रगत 5G सेवा असेल, असा दावा मुकेश अंबानी यांनी केला आहे. दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह अनेक शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू होईल. त्यानंतर दर महिन्याला त्याचा विस्तार केला जाईल. डिसेंबर 2023 पर्यंत, Jio 5G देशातील प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आणि प्रत्येक तहसीलपर्यंत पोहोचेल.

रिलायन्स जिओचा स्वस्तातील 5G मोबाईल 'असा' असणार

रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली. त्याशिवाय, रिलायन्सकडून देशातील स्वस्तातील 5G स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. या स्वस्त दरातील स्मार्टफोनसाठी रिलायन्सने जगातील दिग्गज आयटी कंपन्यांसोबत भागिदारी केली आहे. रिलायन्स सगळ्यात स्वस्तातील 5G स्मार्टफोन लाँच करणार असल्याची चर्चा होती. या स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याचे म्हटले जात आहे. या स्वस्तातील मोबाईलची वैशिष्ट्ये कसे असतील याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.