एक्स्प्लोर

शहीद निनाद मांडवगणे अनंतात विलीन, चिमुकलीला पाहून गोदाकाठ हेलावला

नाशिकचे पायलट स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांचा बडगाममध्ये 27 फेब्रुवारीला हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई-वडील आणि धाकटा भाऊ असं कुटुंब आहे.

नाशिक : जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले नाशिकमधील वैमानिक निनाद मांडवगणे अनंतात विलीन झाले. नाशिकमधील गोदाकाठावर भारतमातेच्या सुपुत्राला लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. भारत-पाकिस्तान तणावजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावताना स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे शहीद झाले. निनाद मांडवगणे यांचं पार्थिव आज सकाळी डीजीपीनगर इथल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं. कुटुंबीयांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव बाहेर आणलं. यावेळी दोन वर्षांच्या चिमुकलीने आपल्या बाबांना अखेरचा निरोप दिला. हा प्रसंग पाहून तिथे उपस्थितांचं मन हेलावलं. निनाद यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे मोठा जनसमुदाय लोटला होता. यावेळी 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा नागरिक देत होते. यानंतर डीजीपीनगरहून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. शहीद निनाद मांडवगणे अनंतात विलीन, चिमुकलीला पाहून गोदाकाठ हेलावला यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास हवाई दलाने निनाद मांडवगणे यांना मानवंदना दिली. मग लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील अंत्यदर्शनाला उपस्थित होते. श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना, नाशिकचा पायलट निनाद मांडवगणे शहीद निनाद मांडवगणे शहीद नाशिकचे पायलट स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांचा बडगाममध्ये 27 फेब्रुवारीला हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई-वडील आणि धाकटा भाऊ असं कुटुंब आहे. निनाद हे औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) 26 व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. तिथून त्यांची निवड पुण्यातील एनडीएमध्ये झाली. त्यानंतर ते हेलिकॉप्टर पायलट बनले. निनाद यांचा जन्म 1986 साली झाला होता. त्यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण भोसला मिलिटरीमध्ये तर अकरावी आणि बारावीचं शिक्षण औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत झालं. नंतर त्यांनी बीई मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलं. मग हैदराबाद ट्रेनिंग कमिशनमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, 2009 मध्ये भारतीय वायू दलात स्क्वॉड्रन लीडर पदावर रुजू झाले. गुवाहाटी, गोरखपूर इथे सेवा करुन एक महिन्यापूर्वीच श्रीनगर इथे त्यांची बदली झाली होती. पण तिथेच त्यांना वीरमरण आलं. सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट टाकणाऱ्यांना वीरपत्नीचा सल्ला   "निनाद हा माझ्या आयुष्याचा भाग होता, राहणार आणि कायम आहे. आज आमच्या घरातून जवान गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरातून जवान जाईल. पण, माझी एक विनंती आहे, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांनो हे बंद करा. जर तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या," असा सल्ला शहिद स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे वीरपत्नीने दिला आहे. तसंच "आम्हाला युद्ध नको, युद्धात काय नुकसान होतं, हे तुम्हाला माहिती नाही. आणखी निनाद जाता कामा नये," अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Embed widget