एक्स्प्लोर
समृद्धी हायवेच्या मोजणीसाठी अधिकारी पुन्हा दाखल, शिवडे गावात तणाव

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या मोजणीसाठी नाशिकच्या शिवडे इथे अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत. गावातील वातावरण तणावपूर्वक असून प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
शिवडे गावाची यात्रा असल्याने नातेवाईक आले आहेत. तेदेखील पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पोलिस बळाचा वापर केल्यास पेटवून घेऊन आत्महत्या करु, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्यांना चॅप्टर नोटीस
दोन दिवसांपूर्वी जमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांनी दगडफेक केली होती. तर आक्रमत पवित्रा घेत जाळपोळही केली होती. समृद्धी महामार्ग मोजणीला हिंसक वळण मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने भूमीसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. VIDEO: स्पेशल रिपोर्ट: मुंबई- नागपूर हायवेचा ग्राऊंड झिरो रिपोर्टआणखी वाचा























