एक्स्प्लोर
Advertisement
बनावट नोटा छापणाऱ्या छबू नागरेवर देशद्रोहाचा खटला?
नाशिक : नाशिकमध्ये 1 कोटी 35 लाखांच्या बनावट नोटा छापणाऱ्या छबू नागरेसह 11 जणांना अटक केल्यानंतर, आता या रॅकेटचे नवनवे खुलासे समोर येत आहेत. घोटाळेबाज छबू नागरेचा अड्डा शोधून काढण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा'ने केला.
राष्ट्रवादीचा पदाधिकारी असणारा छबू नागरे तब्बल 200 कोटींच्या छपाईचं टार्गेट ठेवून होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र नागरेचे काळे मनसुबे पूर्ण होण्याच्या आत 85 कोटींची डील होत असतानाच नागरेच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नाशिक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कारवाई करुन 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या. तसंच छबू नागरेसह 11 जणांना अटक केली. राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या छबू नागरे याच्या खुटवडनगरमधील एका फ्लॅटमध्ये नोटा छपाईचं सामान आढळलं. फ्लॅटमधून पेपर कटिंगचे कटर, 2 प्रिंटर,1 स्कॅनर, आणि वेगवेगळ्या रंगाच्या शाई सापडल्या.
1.35 कोटींच्या बनावट नोटा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह 11 अटकेत
बनावट नोटा मार्केटमध्ये आणण्यासाठी नागरे आपल्या अॅक्सेस मायक्रो फायनान्स पतसंस्थेचा वापर करायचा, असा संशय आहे. दरम्यान छबू नागरेवर देशद्रोहाचा खटला दाखल होण्याची दाट शक्यता आहे. प्रकरण काय आहे? नाशिक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कारवाई करुन 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या. तर 1 लाख 80 हजाराच्या जुन्या खऱ्या नोटा, सुमारे दीड लाखांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा, अशा एकूण 1 कोटी 39 लाखांच्या नोटा हस्तगत केल्या. बनावट नोटा छापत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार कारवाई करत 11 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्यांच्याकडून 3 आलिशान कारही जप्त केल्या. राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष छबु नागरे, रामराव पाटील यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली.नाशिक बनावट नोटा प्रकरण : 11 आरोपींच्या घरांची झडती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
नाशिक
क्रीडा
Advertisement