एक्स्प्लोर
नाशिकचे सायकल वारकरी पंढरपूरकडे

नाशिक: विठू नामाचा जयघोष करत नाशिकमधून आज शेकडो वारकरी चक्क सायकलवरुन पंढरपूरला रवाना झाले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठू नामाच्या गजरात सायकल वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.
वारीला साहित्य, संस्कृती, अध्यात्माची परंपरा जरी असली, तरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, ही सायकलवारी आयोजित केली जाते.
सायकल वारीमध्ये पोलीस अधिकारी, उद्योजक, डॉक्टर यांच्यासोबतच वयोवृद्ध आणि महिलांचाही मोठा सहभाग असतो.
यंदा या वारीत सायकलींचे रिंगण अनुभवायला मिळणार असून, अशाप्रकारचे हे पहिले रिंगण होणार आहे.
नाशिक ते पंढरपूर हा सुमारे 350 किमीचा प्रवास हे वारकरी 3 दिवसात पूर्ण करणार आहे. वारीचा मार्ग हा नाशिक, सिन्नर, नगर पासून पुढे टेंभुर्णी ते पंढरपूर असा असेल.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेक-गॅजेट
आशिया कप 2022
अमरावती
भारत
Advertisement
Advertisement



















