नाशिकमध्ये अल्पवयीन मुलाचे धक्कादायक कृत्य, भिक्षेकरीच्या डोक्यात दगड घालत केला खून
नाशिकमध्ये (Nashik) एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाने एका भिक्षेकरीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
Nashik Crime News : नाशिकमध्ये (Nashik) एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाने एका भिक्षेकरीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरुन त्र्यंबक नाका परिसरात एका अल्पवयीन मुलाने एका भिक्षेकरीच्या डोक्यात दगड घालून भर दिवसा खून करत मृतदेहा जवळच हातवारे करत नाचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आरोपी अल्पवयीन मुलगा मैत्रिणीसोबत ठक्कर बजार जवळील एका हॉटेल जवळ उभा होता. त्यावेळी त्याची मैत्रीण पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता तिथे एक भिकारी बसलेला होता. त्याने या मुलीची छेड काढण्याचा संशय त्या विधीसंघर्षित मुलाला आल्याने त्याने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड टाकला या घटनेत अज्ञात भिक्षेकरीचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला, यातील संशयित अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आह. तर मृत्यूदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून सरकारवाडा पोलिस पुढील तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या:























