एक्स्प्लोर
दसऱ्याआधी सीमोल्लंघन करणार : नारायण राणे
नारायण राणेंचे समर्थक असलेल्या सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर, राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवत दसऱ्यापूर्वी सीमोल्लंघन करणार असल्याचा सूचक इशारा नारायण राणेंनी आज दिला आहे.

मुंबई : नारायण राणेंचे समर्थक असलेल्या सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर, राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवत दसऱ्यापूर्वी सीमोल्लंघन करणार असल्याचा सूचक इशारा नारायण राणेंनी आज दिला आहे. काँग्रेस कमिटीने नारायण राणे समर्थक दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करुन, पक्षाचे निष्ठावंत विकास सावंत यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली. त्यामुळे कोकणातील काँग्रेस म्हणजे आपणच अशा थाटात वावरणाऱ्या राणेंना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीनंतर एबीपी माझाशी बोलताना राणे म्हणाले की, नातवाच्या वाढदिवसादिवशी सीमोल्लंघन करत आहे. नवरात्रीत याचा शेवट करेन. सिंधुदुर्गात जाऊन पुढील रुपरेषा ठरवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच कार्यकारिणी बरखास्तीवरुनही अशोक चव्हाणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राणे म्हणाले की, ‘’नांदेडमध्ये काँग्रेस संपली, आता राज्य काय सांभाळणार?’’ असा सवाल उपस्थीत केला आहे. तसेच काँग्रेसमध्ये आल्यापासून अशोक चव्हाण नेहमी कुरघोडीचं राजकारण करत आहेत,'' असंही ते यावेळी म्हणाले. काय म्हणाले नारायण राणे? संबंधित बातम्या नारायण राणेंना काँग्रेसचा मोठा धक्का, जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
आणखी वाचा























