एक्स्प्लोर

'...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानाखाली लगावली असती'; नारायण राणेंची जीभ घसरली

राजकीय स्वार्थासाठी नारायण राणे यांना चाटुगिरी करण्याची सवय आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून असं विधान करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद मावळ्यांमध्ये आहे, असं प्रत्युत्तर विनायक राऊतांनी दिलं आहे.

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

'राणेंचे हात छाटण्याची मावळ्यांमध्ये ताकद'

राजकीय स्वार्थासाठी नारायण राणे यांना चाटुगिरी करण्याची सवय आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून असं विधान करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद मावळ्यांमध्ये आहे, असं प्रत्युत्तर खासदार विनायक राऊत यांनी दिलं आहे. त्यामुळे आता आगामी काळात राणेंचं वक्तव्य राज्याच्या, देशाच्या राजकारणात शिवसेना- भाजपमध्ये मोठ राजकीय वाययुद्ध रंगण्यास कारणीभूत ठरणार आहे. 

कसे उमटणार राजकीय पडसाद?

उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख देखील आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील ही टीका शिवसैनिक किती सहन करतील हे सध्या सांगता येत नाही. पण, राणेंची यात्रा सुरू झाल्यापासून शिवसेनेनं त्याला शक्यतो प्रत्युत्तर न देण्याचं धोरण अवलंबलं आहे. पण, आता उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावण्याची भाषा केल्यानं यावरून मोठा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासदार राऊत यांनी दिलेल्या उत्तरानंतर आता शिवसेनेचे इतर देखील याला प्रत्युत्तर देणार का? शिवाय मातोश्रीवरून काय आदेश सुटणार हे पाहावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nalasopara Crime : पैशांच्या व्यवहारावरून वाद, शिवीगाळ अन् दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकासह 5 जणांवर गुन्हा दाखल
पैशांच्या व्यवहारावरून वाद, शिवीगाळ अन् दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकासह 5 जणांवर गुन्हा दाखल
Ganesh Visarjan Mumbai 2026 Live: निरोप घेतो देवा... आज अनंत चतुर्दशी, विसर्जन मिरवणुकांची लगबग, लालबागमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी
Ganesh Visarjan Mumbai 2026 Live: निरोप घेतो देवा... आज अनंत चतुर्दशी, विसर्जन मिरवणुकांची लगबग, लालबागमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी
Ganesh Visarjan Pune 2026 Live: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...पुण्यात विसर्जनाची जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज
Ganesh Visarjan Pune 2026 Live: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...पुण्यात विसर्जनाची जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज
Nagpur Accident News: नागपूर-अमरावती रोडवर भीषण अपघात; ट्रकची दुचाकीला धडक, कामगाराचा जागीच मृत्यू
नागपूर-अमरावती रोडवर भीषण अपघात; ट्रकची दुचाकीला धडक, कामगाराचा जागीच मृत्यू

व्हिडीओ

Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
Uddhav Thackeray on Drought : 31 हजार कोटींमधली किती मदत शेतकऱ्यांना पोहोचली?
Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident News: नागपूर-अमरावती रोडवर भीषण अपघात; ट्रकची दुचाकीला धडक, कामगाराचा जागीच मृत्यू
नागपूर-अमरावती रोडवर भीषण अपघात; ट्रकची दुचाकीला धडक, कामगाराचा जागीच मृत्यू
Gyanesh Kumar : निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात? मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणण्याची विरोधकांची तयारी
निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात? मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणण्याची विरोधकांची तयारी
Mushtaq Khan Death : 'मेरी एक टांग नकली है...' डायलॉग गाजवणारा दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड, कर्करोगाने निधन
'मेरी एक टांग नकली है...' डायलॉग गाजवणारा दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड, कर्करोगाने निधन
Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कोल्हापुरातून पहिलं आव्हान, खंडपीठात याचिका दाखल
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कोल्हापुरातून पहिलं आव्हान, खंडपीठात याचिका दाखल
SBI ATM Rules : 1 ऑक्टोबरपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; बँकेची मोठी घोषणा
1 ऑक्टोबरपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; बँकेची मोठी घोषणा
No UPI Day : मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
सीलबंद पोत्यात खताचं वजन कमी, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक; हमालाचा व्हिडिओ व्हायरल, राजू शेट्टींचा फोन
सीलबंद पोत्यात खताचं वजन कमी, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक; हमालाचा व्हिडिओ व्हायरल, राजू शेट्टींचा फोन
दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलचा धाक दाखवून लुटले; विद्यार्थ्यांना लुटणारी टोळी जेरबंद, दोन विधिसंघर्ष बालक
दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलचा धाक दाखवून लुटले; विद्यार्थ्यांना लुटणारी टोळी जेरबंद, दोन विधिसंघर्ष बालक
Embed widget