एक्स्प्लोर
नाशिकच्या आंदोलनामुळे नंदुरबार बस आगराला 25 लाखांचा फटका
नंदुरबार: नाशिक जिल्ह्याच्या तळेगाव येथील घटनेवरुन नाशिक जिल्ह्यात 9 तारखेपासून तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या आंदोलनात राज्य परिवहनच्या तब्बल 19 गाड्या जाळल्या गेल्या. त्यामुळे परिवहन मंडळाने नाशिकडे जाणाऱ्या सर्व बससेवा तत्काळ रद्द केल्या. यामुळे एस.टी. महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नाशिकच्या या आंदोलनाचा फटका नंदुरबार बस आगरालाही बसला आहे.
नंदुरबार बस आगाराच्या 7 दिवसात 180 फेऱ्या रद्द करव्या लागल्यामुळे जवळपास 25 लाखांचे नुकसान झाले आहे.
नाशिक, मुंबईसाठी एसटीच्या रोज 10 बसेस होतात. याचा हजारो प्रवाशांना लाभ होतो. मात्र 9 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या आंदोलनामुळे नाशिकडे जाणाऱ्या बससेवा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. याचा जोरदार फटका महामंडळाला बसला आहे.
180 बसफेऱ्या रद्द झाल्याने 25 लाखांचे नुकसान झाले आहे. आता ही भरपाई भरुन काढण्याकरता दिवाळी सणाची वाट पाहावी लागणार आहे. झालेला तोटा दिवाळीत सुटणाऱ्या जादा बसेस मधून निघेल ही अपेक्षा आगार व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या
नाशिकमधील आंदोलनात एसटीचं कोट्यवधीचं नुकसान
नाशिक : हिंसाचाराप्रकरणी 117 जणांना अटक, सायबर क्राईमअंतर्गत 8 गुन्हे
नाशकात बससेवा ठप्प, इंटरनेट-बिअर बारही तीन दिवस बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement