एक्स्प्लोर

Nanded Earthquake : नांदेड परिसरात भूकंपाचे धक्के, भूकंपाचं केंद्र यवतमाळ जिल्ह्यात, घाबरुन न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन

नांदेड शहरासह परिसरामध्ये सौम्य भूकंपाच्या धक्क्यासह जमिनीतून गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात असल्याची माहिती आहे.

नांदेड : नांदेड शहरासह परिसरामध्ये सौम्य भूकंपाच्या धक्क्यासह जमिनीतून गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नांदेड शहरातील फरांदे नगर, छत्रपती चौक, तरोडा नाका, स्नेहनगर व जिल्ह्यातील अर्धापुर, हदगाव, मालेगाव ,मुदखेड, हिमायतनगर परिसरात रविवारी सकाळी 8 वाजून 32 मिनिटांनी व 8:42 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले.  शहरासह जिल्हाभरात बसलेल्या ह्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे घरातील भांडीकुंडी, पलंग, खुर्च्या हादरत होत्या असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलंय. तर अर्धापूर तालुक्यातही भूकंपामुळे घरावरील पत्रे हलल्यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.  या भूकंपाचं केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात असून त्याठिकाणी या भूकंपाची 4.4 रिष्टर स्केलची नोंद करण्यात आलीय. तर नांदेड जिल्ह्यातील भूकंपाचे बसलेले धक्के किती रिष्टर स्केलचे होते याची माहिती घेण्याचा प्रयत्न स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे डॉ. टी. विजयकुमार हे करत आहेत.यात दोन्ही भूकंपाची वेळ एकच असल्याने माहिती मिळण्यास अडचण येऊन वेळ लागत असल्याची माहिती डॉ.विजयकुमार यांनी दिलीय.त्यामुळे याविषयी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात नांदेड जिल्ह्यातील ह्या भूकंपाची तीव्रता  अथवा रिष्टर स्केल किती होती हे तपासणे सुरू आहे. तर नागरिकांनो घाबरून जाऊ नका असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केलेय.

नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही

नांदेड प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेय की आज सकाळी 8:33 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले,ते यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून निदर्शनास येत आहे. याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी होती.  मी आपल्या शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, मुख्यालय यांच्याशी संपर्कात असून जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आम्ही घेत आहोत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितलेय.

भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात मात्र भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत : जिल्हाधिकारी अमोल येडगे 
या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर आजूबाजूच्या गावांमध्ये भूकंपाचे कोणतेही धक्के जाणवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच कोणतीही हानी झालेली नाही. महागाव तहसिलदार आणि त्यांची चमू यांनी गावांमध्ये भेट दिली असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मुडोना आणि साधूनगर परिसरात या भूकंपाचे केंद्र दाखवले असून त्याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी नोंदवली आहे. केंद्रबिंदूच्या ठिकाणी  शेती भूभाग आहे, मात्र आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना  सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे महागाव तहसीलदार नामदेव इसळकर यांनी सांगितले. केंद्रबिंदूच्या गावांमध्ये त्यांनी भेट देऊन नागरिकांकडून माहिती घेतली. आजूबाजूच्या 10 किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये पोलीस पाटलांकडून माहिती घेतली असता कुठेही धक्के जाणवले नाहीत अशी माहिती त्यांनी दिली. तसेच जीवित व वित्त  हानी झालेली नासल्याचेही  इसळकर यांनी सांगितले . तरीही आमची चमू दिवसभर काही घडामोडी झाल्यास परिस्थिती हाताळण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.  प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे असे उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHADevendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्यMahayuti Goverment : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह युतीचे नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावाDevendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Embed widget