Nanded : क्षुल्लक कारणांवरुन भावानेच केला सख्या भावाचा खून, माहूर तालुक्यातील नात्याला काळिमा फासणारी घटना
क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाल्याने रामेश्वर जाधव याने रागाच्या भरात त्याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर जाधव याच्या पोटात सुरा खुपसला आणि त्यातच त्याचा अंत झाला.

नांदेड : माहूर तालुक्यातील दत्त मांजरी येथे क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाने छोट्या भावाच्या पोटात सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सख्या भावांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात पोटात सुरा भोसकून खून केल्याची घटना माहूर तालुक्यातील दत्तमांजरी येथे घडलीय.
माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी येथे रामेश्वर बाबूलाल जाधव व ज्ञानेश्वर बाबूलाल जाधव या दोन सख्ख्या भावात बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. सदर वादाचे हाणामारीत रुपांतर झाल्याने आरोपी रामेश्वर बाबूलाल जाधव (वय 27) याने रागाच्या भरात त्याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर बाबूलाल जाधव (वय 25) याच्या पोटात सुरा खुपसला. त्यामुळे रक्तस्त्राव सुरु झाल्याने जखमी ज्ञानेश्वर बाबूलाल जाधव याला गावातील लोकांनी उपचारासाठी माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
यात अक्षय उत्तम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माहूर पोलीस ठाण्यात आरोपी रामेश्वर बाबूलाल जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सख्या भावानेच भावाचा काटा काढल्यानं भावाच्या या नात्याला काळिमा फासल्याची घटना घडील आहे. या घटनेमुळे गावात मात्र हळहळ व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या् :
- Eknath Khadse : प्रकृती अस्वास्थामुळे एकनाथ खडेंची पत्रकार परिषद रद्द झाल्याचं राष्ट्रवादीचं ट्वीट; ईडी चौकशीसाठी हजर राहणार?
- Miss Mexico 2021 : कोरोनाची लक्षणं दिसत असतानाही स्पर्धा सुरु, अर्ध्या स्पर्धकांना कोरोनाची लागण
- Lambda Variant : डेल्टा नंतर आता 'लॅम्बडा'चा धोका; डेल्टा प्लस पेक्षाही अधिक धोकादायक असण्याची शक्यता
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
महत्त्वाच्या बातम्या






















