उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे संकेत, नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य, मविआत राजकीय घडामोडींना वेग
उद्धव ठाकरे जर स्वबळावर निवडणूक लढणार असतील तर त्यांचं स्वागत करु असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
Nana Patole on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे जर स्वबळावर निवडणूक लढणार असतील तर त्यांचं स्वागत करु असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी हा निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं असंही पटोले म्हणाले. निवडणुका लागल्या नाहीत मात्र जर तुमची तयारी पूर्ण झाली तर आपण नक्कीच कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेऊ, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
निवडणुका लागल्या नाहीत मात्र जर तुमची तयारी पूर्ण झाली तर आपण नक्कीच कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेऊ, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. काही दिवसातच महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. मी सगळ्यांशी बोलत आहे, मुंबईसह नाशिक, नगर सगळ्यांशी बोलून झाले आहे. सगळ्यांचं मत एकटं लढा असं आहे. पण, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. आधी तुमची जिद्द बघूया. तुमची तयारी बघूया, ज्यादिवशी तुमची तयारी झाली ही खात्री पटेल. त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
नरेंद्र मोदी सरकारचं अपयश, पहिल्यांदा असा स्फोट झाला
भंडाऱ्यात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबात नाना पटोले यांनी दु:ख व्यक्त केलं. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या काळात ऑर्डनसे फॅक्टरी देखील सुरक्षित नाही. RDX आयात करताना त्यात भ्रष्टाचार होतो. हे नरेंद्र मोदी सरकारच अपयश आहे पहिल्यांदा असा स्फोट झाला असल्याचे पटोले म्हणाले.
काल मुख्यमंत्र्यांनी दावोसमधून ट्विट केलं आहे की, 61 कंपन्या इंच्छुक आहेत असा त्यांचा दावा आहे. मोठ्या प्रमाणत रोजगार उपलब्ध होतील असा त्यांचा दावा आहे. दरवर्षी मुख्यमंत्री तिथे जातात. या दौऱ्यासाठी सामान्यांचा पैसा खर्च होतो. 20 लोकांची टीम तिथे गेली आहे. त्यासाठी किती खर्च झाला असेल असेही पटोले म्हणाले. 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात magnetic maharashtr असा सोहळा चौपाटीवर घेतला होता. त्याला 16 लाख कोटींची गुंतवणूक झाली असा दावा केला आहे. ही गुंतवणूक कुठे गेली? असा सवाल पटोलेंनी केला आहे.
महाराष्ट्राला दारु राष्ट्र करायचं आहे का?
61 कंपन्यांपैकी केवळ 10 कंपन्या परदेशी आहेत इतर भारतीय आहेत. छतीसगडचे मुख्यमंत्री अलीकडे आले होते आणि महाराष्ट्रातून गुंतवणूक घेऊन गेल्याचे पटोले म्हणाले. आज येताच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या काळात किती उद्योग आणले आणि किती लोकांना रोजगार दिले याची श्वेतपत्रिका काढावी. जर त्यानी उद्योग आणले आणि ते बसले असतील तर स्वागत आहे असेही पटोले म्हणाले. हिरानंदानी कंपनीचं नाव आहे, मात्र उठलेल्या लोकांची घर बळकावून ते काम करतात. भविष्य निर्वाह निधीची केस त्यांच्या विरोधात आहे असे पटोले म्हणाले. बीयर बनवणाऱ्या कंपन्यांशी सरकार करार करत आहे. महाराष्ट्राला दारु राष्ट्र करायचं आहे का? असा सवाल पटोलेंनी केला. एकीकडे संविधान सांगत की धोकादायक व्यवस्थेला आळा घालावा मात्र त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे पटोले म्हणाले.
हानिकारक गुंतवणूक नसल्यास त्याच स्वागत करु
जालन्याच्या कंपनीशी drone बनवण्याचा करार केला आहे. मात्र, त्यांच्याकडे कोणतीही जागा नाही. त्याची उत्तरं द्यावी अशी अपेक्षा आहे. हानिकारक गुंतवणूक नसल्यास त्याच स्वागत आहे. हरित उद्योग ही आमची भूमिका आहे असे पटोले म्हणाले. दारु राष्ट्र करण्याची भूमिका असेल तर आम्ही त्याचा स्वागत करणार नाही असे पटोले म्हणाले. केवळ जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असतील तर आम्ही स्वागत करणार नाही असे पटोले म्हणाले. मागचे मुख्यमंत्री 100 लोक घेऊन गेले होते. वर्षा बंगल्यापासून पावलाच्या अंतरावर अनेक यातील उद्योजक राहतात असेही पटोले म्हणाले.