एक्स्प्लोर
नेते तुपाशी, पोलीस उपाशी, डाळ-भात खाऊन पोलिसांची अधिवेशनाला सुरक्षा
पोलिसांच्या ताटात 9 पदार्थांचे आश्वासन असताना फक्त 2 पदार्थच पोलिसांना देण्यात आले.

नागपूर: नेते तुपाशी, पोलीस उपाशी अशीच परिस्थिती नागपुरात पाहायला मिळाली. राज्याच्या हिवाळी अधिवेशन काळात कायदा- सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अर्धवट आणि निकृष्ट जेवण देण्यात आलं. पोलिसांच्या ताटात 9 पदार्थांचे आश्वासन असताना फक्त 2 पदार्थच पोलिसांना देण्यात आले. हे दोन पदार्थ म्हणजे फक्त वरण आणि भातावर बोळवण करण्यात आली. चपाती, 2 भाज्या, सलाड, मिठाई, लोणचे, पापड यापैकी एकही पदार्थ पोलिसांना मिळाला नाही.
इतकंच नाही तर, उभं राहून, नेहमीच सतर्क असणाऱ्या पोलिसांना सकाळचे जेवण दुपारनंतर म्हणजेच साडे तीन वाजता देण्यात आले. यावरुनच सरकार तुपाशी आणि सरकारच्या सुरक्षेसाठी तैनात हजारो पोलीस उपाशी, असं चित्र नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. जर पोलीस सशक्त असेल, तर समाज सशक्त, सुरक्षित राहील. मात्र पोलिसांनाच जर दुपारी तीन-साडेतीन वाजता जेवण मिळणार असेल, तर पोलीस आपली शारीरिक क्षमता कशी टिकवून ठेवणार आणि समाजाचं रक्षण कसं करणार हा प्रश्न आहे.
इतकंच नाही तर, उभं राहून, नेहमीच सतर्क असणाऱ्या पोलिसांना सकाळचे जेवण दुपारनंतर म्हणजेच साडे तीन वाजता देण्यात आले. यावरुनच सरकार तुपाशी आणि सरकारच्या सुरक्षेसाठी तैनात हजारो पोलीस उपाशी, असं चित्र नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. जर पोलीस सशक्त असेल, तर समाज सशक्त, सुरक्षित राहील. मात्र पोलिसांनाच जर दुपारी तीन-साडेतीन वाजता जेवण मिळणार असेल, तर पोलीस आपली शारीरिक क्षमता कशी टिकवून ठेवणार आणि समाजाचं रक्षण कसं करणार हा प्रश्न आहे. Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















