(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RTMNU : नागपूर विद्यापीठाचा अजब कारभार; परीक्षेच्या तोंडावर बदलला 'हा' अभ्यासक्रम
नागपूर विद्यापीठाच्या या BSWच्या नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकेही उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेले आहेत. तसेच प्राध्यापकांनाही नवीन अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार हा प्रश्न पडला आहे.
Nagpur News : आपल्या अजब निर्णयांमुळे सतत चर्चेत असणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विद्यापीठाने समाजकार्य पदवी (बीएसडब्ल्यू) (BSW)च्या अभ्यासक्रमात पूर्णपणे बदल करुन विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध केला. बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाचे पहिले सत्र संपत आले असताना, या निर्णयामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक संभ्रमात असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
समाजकार्य अभ्यास मंडळाद्वारे अभ्यासक्रमातील मराठी, इंग्रजी, समाजशास्त्र, मानसशास्त्र, समाजकार्य या विषयांचा पूर्णपणे नवीन अभ्यासक्रम तयार करुन सदर अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (RTMNU Website) अपलोड करण्यात आला आहे. प्राध्यापकांनी सत्र 2022-23 पासून हा नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) विद्यार्थ्यांना शिकवण्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, BSW पदवी अभ्यासक्रमाचे सत्र जुलै 2022 पासून सुरु झाले असून आतापर्यंत सर्वच विषयांच्या प्राध्यापकांनी जुन्या अभ्यासक्रमानुसार शिकवणे पूर्ण केले आहे. आता हे सत्र संपत आले असताना आणि विद्यार्थ्यांची परीक्षेची वेळ आली असताना अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
विद्यापीठाद्वारे नवीन अभ्यासक्रमानुसार शिकवण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, बीएसडब्ल्यू प्रथम सत्रात समावेश असलेल्या अभ्यासक्रमातील इंग्रजी आणि मराठी विषयांचे पाठ्यपुस्तकच अद्याप तयार झालेले नाही. नवीन अभ्यासक्रमानुसार या विषयांच्या पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीसाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. समाजशास्त्र, मानसशास्त्र, समाजकार्य या विषयांचा अभ्यासक्रमही पूर्णपणे बदलण्यात आला असल्यामुळे आता नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना कसे शिकवावे? नवीन अभ्यासक्रमानुसार संदर्भ ग्रंथांची जुळवाजुळव करुन संबंधित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविणे कुठल्याही परिस्थितीत शक्य नाही.
24 दिवसांत नवीन अभ्यासक्रमानुसार शिकवणे अशक्य!
31 ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध झाला. 24 नोव्हेंबरपर्यंत 2022 रोजी पहिले सत्र संपत असून त्यानंतर विद्यापीठाद्वारे महाविद्यालयाला हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 07 डिसेंबर 2022 पर्यंत हिवाली सुट्ट्या घोषित केल्या आहेत. यानंतर दुसरे सत्र सुरु होणार आहे. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला असून, अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकेही उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेले आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर वरील माहिती दिली.
ही बातमी देखील वाचा
Nagpur News : प्राध्यापक ब्लॅकमेल प्रकरण; सखोल चौकशी करुन दोषींना शिक्षा देऊ : कुलगुरु सुभाष चौधरी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI