एक्स्प्लोर

नागपूरच्या रेड लाईट एरियात शिक्षणाचा प्रकाश, त्या 'तिघीं'ची कहाणी

नागपूर : महाराष्ट्रभरात ज्यांना ज्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत त्या मुलांची नावं आतापर्यंत आपल्याला पाठही झाली असतील. पण त्या यशाहून काहीशी वेगळी आणि चौकटीबाहेरच्या यशाची कहाणी नागपुरातून समोर आली आहे. या विद्यार्थिनी टॉपर नसल्या, तरी त्यांच्या जिद्दीची, प्रेरणादायी यशाची कहाणी थक्क करणारी आहे. नियतीला हरवत पाय रोवून उभं राहाणं म्हणजे काय हे या मुलींकडून शिकायला हवं. कारण ही कहाणी या तिघींच्या यशाची नाही, तर या तिघींच्या असामान्य लढ्याची आहे. नागपूरच्या करुणाश्रम वसतिगृहात राहणाऱ्या या तिघी. दहावीच्या परीक्षेत शिवानीला 51 टक्के, निवेदिताला 45 टक्के तर पूर्वाला बारावीच्या परीक्षेत 56 टक्के गुण मिळाले आहेत. एकीकडे 100 टक्के गुण मिळवणाऱ्या मार्कशीटसमोर हे गुण कमी असतीलही पण या गुणांमागचा संघर्ष सोपा नाही. शिवानी अवघ्या तेराव्या वर्षी सामुहिक बलात्काराला बळी पडली. एकीकडे आई वडिल तिच्या बाजूने कोर्टात लढत होते तर दुसरीकडे तिला एका देहव्यवसायातल्या एजंटनं हेरलं होतं. निवेदिता जिथे राहायची ती वस्तीच अशी होती. एकदा वस्तीवर धाड पडली आणि रेडमध्ये सापडलेल्या निवेदिताला वसतिगृहात आणलं गेलं. पूर्वाला दहावीला 70 टक्के मिळाले. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी तिला तालुक्याच्या ठिकाणी पाठवण्यात आलं. मात्र नशिबाचे फासे उलटे पडले. पूर्वाही देहविक्रीच्या व्यवसायात वाहवत गेली. एकीकडे घरची गरिबी आणि दुसरीकडे या व्यवसायातून मिळणारा पैसा यामुळे तिघीही डोळेझाक करुन पुढे जात राहिल्या आणि यामुळेच अभ्यास नावाचा शब्द आयुष्याच्या पाटीवरून कधी पुसला गेला हे त्यांनाही कळलं नाही. मनगटातल्या जोरावर त्यांनी आपलं यश इतकं परफेक्ट खेचून आणलं की त्यांच्या यशाला आत्मविश्वासाची झळाली मिळाली. आयुष्याच्या प्रवाहात वयामुळे, काळामुळे या मुलींची काही पावलं चुकीची पडली. कधी धडपडल्या कधी परिस्थितीला सामोऱ्या गेल्या. मात्र या मुलींचं मार्कशीट बोर्डाच्या निकालाच्या नेहमीच टॉपला असेल हे निश्चित.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget