एक्स्प्लोर

Nagpur News: 'मोदी सरकारची हमी' नावावरून युवक काँग्रेस आक्रमक; पंतप्रधानांच्या फोटोला फासले काळं

Maharashtra Youth Congress:मोदी सरकारची हमी या आशयाचे लावलेल्या बॅनर्स विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेस आक्रमक झाली असून पंतप्रधान निष्फळ गोष्टीवर जनतेचा पैसा खर्च करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नागपूर : केंद्र कुठलीही योजना ही करदात्याच्या पैशाने राबविली जाते. त्यामुळे ती भारत सरकारची हमी अशी असायला हवी. मात्र असे न होता ती 'मोदी सरकारची हमी' अशा नावाने करण्यात आली आहे. यातून पंतप्रधान मोदी (PM Modi) सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतची प्रसिद्धी करत आहेत. असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी (Maharashtra Pradesh Youth Congress) आंदोलन करत  नागपूरात जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले. सोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे देखील फासले. या आंदोलनामुळे नागपूर जिल्हा परिषदेत काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून स्वतःची प्रसिद्धी 

भारत सरकारव्दारे विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. या योजना विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी, या उद्देशाने योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात येतात. असे काही पोस्टर्स आणि बॅनर्स नागपूर जिल्हा परिषदेच्या आवारात देखील लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर भारत सरकार व्दारा राबविलेल्या जाणाऱ्या योजनांविषयी अतिशय नगण्य माहिती आहे. सोबतच शासकीय योजना ह्या मोदी सरकारची हमी असा उल्लेख त्यावर केला केलेला आहे.

या योजना कोणासाठी, याचे निकष काय, लाभासाठी कोणाला संपर्क साधायचा अशी कोणतीही कामाची माहिती या बॅनर्समध्ये नसल्याने जनजागृतीचा उद्देश सफल होताना दिसून येत नाही. तसेच यातून नागरिकांची दिशाभूल करत शासकीय आवारात फक्त पंतप्रधान मोदी हे आपली स्वतःची प्रसिद्धी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केला आहे. सोबतच केवळ स्वतच्या प्रचार-प्रसारासाठी सर्वसामन्यांच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे या निष्फळ गोष्टीवर जनतेचा पैसा खर्च करणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत म्हणाले. 

व्यक्तिविशेषाच्या नावाचा उल्लेख खपवून घेतला जाणार नाही

भारत लोकशाही राष्ट्र असून देशाचा कारभार हा पंतप्रधान मार्फत चालविण्यात येतो. मात्र, जाहीरातीत व्यक्तिविशेषाच्या नावाचा उल्लेख केला जात नाही. शासनाच्या योजना या भारत सरकारच्या योजना असतांना मोदी सरकारच्या योजना असा उल्लेख करणे उचित नाही. त्‍यामुळे मोदी सरकारची हमी असा उल्लेख असलेले बॅनर्स तत्काळ  हटविण्यात यावे. अशी मागणी  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा वतीने करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तिविशेषाच्या नावाचा उल्लेख असलेली बॅनर्स महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस व्दारे उतरविण्यात येतील आणि  त्याविरोधात तीव्र आंदोलन देखील करण्यात येईल.असा इशारा देखील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यानी दिला आहे. 

इतर महत्वाच्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget