एक्स्प्लोर
भाजप नेता मुन्ना यादवच्या दोन्ही मुलांचं आत्मसमर्पण
दिवाळीच्या सुमारास झालेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात मुन्ना आणि त्याचा भाऊ फरार आहेत.
नागपूर : मारहाण आणि हत्या प्रकरणात फरार असलेला भाजप नेता मुन्ना यादव याची मुलं पोलिसात शरण आली आहेत. करण यादव आणि अर्जुन यादव यांनी धंतोली पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे.
21 ऑक्टोबर रोजी झालेल्या हत्येच्या प्रयत्नातील आरोपी असलेला मुन्ना यादव आणि त्याचे कुटुंबीय फरार आहेत. मुन्नाच्या मुलांनी आत्मसमर्पण केलं असलं, तरी अद्याप मुन्ना आणि त्याचा भाऊ फरार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मुन्ना यादव प्रकरणात सरकारला चांगलंच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मुन्ना यादव नागपूरजवळच एका फार्म हाऊसवर लपला असल्याचा दावाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता.
काय आहे प्रकरण?
ऐन दिवाळीत अजनी परिसरात मुन्ना यादव आणि मंगल यादव यांच्या कार्यकर्त्यात तुंबळ हाणामारी झाली होती. लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड्स आणि तलवारीने एकमेकांवर जीवघेणे हल्ले झाले होते. यात दोन्ही गटातील दहा जण गंभीर जखमी झाले होते.
पोलिसांनी दोन्ही गटांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. मात्र नागपूर पोलिसांना मुन्ना यादव काही सापडत नाही.
‘नागपूर पोलिस रात्रंदिवस मुन्ना यादवचा शोध घेत आहेत. तो सापडत नसल्याचं सांगितलं जात आहे. परंतु हा मुन्ना यादव आजही नागपूरपासून 22 किलोमीटर अंतरावरील एका फार्म हाऊसमध्ये दडून बसला आहे.’ असं विखे पाटील म्हणाले होते.
मुन्ना यादव नागपुरातील फार्म हाऊसवरच, विखे-पाटलांचा गौप्यस्फोट
‘मुन्ना यादव नेमका कुठे आहे, याची माहिती सभागृहात जाहीर झाल्यामुळे तो तिथून फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलिसांनी नागपूरमधील भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा यांची सखोल चौकशी करावी. मागील आठवडाभरातील त्यांचे मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्स तपासावे. पोलिसांना मुन्ना यादवचे धागेदोरे मिळतील.’ असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते. ‘या सरकारने क्षुल्लक राजकीय हेतूसाठी गुंडांना पाठीशी घालण्याचं धोरण स्वीकारल्यामुळे समाजात ‘मुन्ना यादव’ निर्माण होऊ लागले आहेत. नागपूर पोलिसांना मुन्ना यादव सापडत नसेल तर त्यांनी त्याला फरार घोषित करावे. त्याला पकडण्यासाठी 50 हजारांचे बक्षीस जाहीर करावे. बक्षीसाची रक्कम द्यायला आपण तयार आहोत.’ असंही विखे-पाटील यावेळी म्हणाले होते. मुन्ना यादवविरुद्ध कारवाई करण्याबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम त्याला इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदावरून बडतर्फ करावे, अशीही मागणीही विखे-पाटील यांनी केली होती.... तर मुंबई पोलिस मुन्ना यादवला अटक करतील : माथुर
मुन्ना यादव प्रकरणावरुन पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी नागपूर पोलिसांना काही दिवसांपूर्वी सुनावलं होतं. ‘जर नागपूर पोलिस शोधू शकत नसतील, तर त्यांनी मुंबई पोलिसांना सांगावं, आम्ही मुंबईत त्याला अटक करु.’ असं ते म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या बोलण्याचा देखील नागपूर पोलिसांवर परिणाम झालेला नाही. कारण अद्यापही मुन्ना यादवला शोधण्यात नागपूर पोलिसांना यश आलेलं नाही. संबंधित बातम्या : नागपूर पोलिसांना आरोपी मुन्ना यादव सापडेना! नागपुरातील भाजप नेते मुन्ना यादव यांची CID चौकशी सुरु स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीत धिंगाणा, मुन्ना यादवांच्या मुलांवर गुन्हाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement