एक्स्प्लोर
नागपुरात बर्थडे पार्टीसाठी धरणावर गेलेले चौघे युवक बुडाले
नागपूर : नागपुरात मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करायला गेलेल्या तरुणांवर काळानं घाला घातल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपुरातल्या बुटीबोरी भागातल्या रामा डॅमजवळ वाढदिवसाची पार्टी करायला गेलेले चार तरुण डॅममध्ये बुडाले.
बुडालेल्या तरुणांपैकी आदित्य चरडे आणि विकी दवंडे अशा दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. तर इतर दोघांचा शोध अजूनही सुरुच आहे.
आदित्यचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे तीन मित्र आणि एक भाऊ रामा डॅमवर गेले होते. आदित्य आणि त्याचे मित्र पाण्यात उतरले होते. मात्र त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडाल्याचं सांगण्यात येतंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement