एक्स्प्लोर
मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर सहा गोळ्या झाडल्या!
नागपूर : नागपूरच्या अग्रसेन चौकात एका वृद्धावर अज्ञाताने गोळीबार केला. या हल्ल्यात 72 वर्षीय एकनाथ निमगडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
संपत्तीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाला आहे.
या हल्ल्यात जखमी झालेले एकनाथ निमगडे आर्किटेक्ट म्हणून घरुनच काम करत होते. आज मॉर्निंग वॉक वरुन घरी परतत असताना गांधी बागेजवळील लाल इमली चौकाजवळ त्यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. यात एकनाथ निमगडे गंभीर जखमी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत नागपूरमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं असूनही त्यांच्याच नागपूरमध्ये वाढलेल्या गुन्ह्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षीततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement