एक्स्प्लोर
नागपुरातल्या डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील फरार आरोपीची आत्महत्या
नागपूर : नागपुरात बहुचर्चित डब्बा ट्रेडिंग प्रकरणातल्या फरार आरोपीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दिनेश गोकलानी असं आत्महत्या केलेल्या आरोपीचं नाव आहे. यामुळे पोलिसांसह या प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
डब्बा ट्रेडिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर जवळपास 3 महिन्यांपासून दिनेश गोकलानी फरार होता. तर या प्रकरणातल्या काही आरोपींनी अटकपूर्व अंतरिम जामीन मिळवला होता. नागपुरातच पिपळा परिसरात दिनेश लपून बसला होता. मात्र पोलिसांच्या हाती तो सापडलाच नाही.
शुक्रवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र दिनेशनं खरोखरच आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात घडला? हा प्रश्नही निर्माण झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement