एक्स्प्लोर
जेव्हा मुख्यमंत्री गातात....सुन रहा है ना तू....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सुन रहा है ना तू" हे गाणं गायलं.
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाणं गुणगुणताना पाहण्याची आणखी एक संधी काल नागपूरकरांना मिळाली.
दैनिक लोकमत वृत्तपत्रातर्फे आयोजित ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ समारंभात गायक अंकित तिवारीच्या आग्रहानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सुन रहा है ना तू" हे गाणं गायलं.
नागपूरच्या मानकापूर क्रीडा संकुलात काल रात्री हा कार्यक्रम पार पडला. गायक अंकित तिवारी यांनी हिंदी चित्रपटातील अनेक गाणी सादर केली.
त्यादरम्यान अंकितने ‘सुन रहा है ना तू’ या गाण्यावर मुख्यमंत्र्यांनाही गाण्याचा आग्रह केला.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत एक ओळ म्हणत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री वहिदा रेहमान यांनीही हजेरी लावली.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement