एक्स्प्लोर
नागपुरात अकाऊंट्स अधिकाऱ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत
नागपूर : नागपुरात एका प्रशिक्षणार्थी डिव्हिजनल अकाऊंट्स अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भूपेश मोर असं या अधिकाऱ्याचं नाव असून पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह संशयास्पदरित्या रस्त्यावर आढळल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र ही घटना अपघात आहे की सुनियोजित पद्धतीने घडवलेला घातपात, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
भूपेश यांची हरियाणा सरकार मध्ये डिव्हिजनल अकाउंट्स अधिकारी या पदावर निवड झाली होती. सध्या ते नागपुरात अकाऊंटंट जनरल म्हणजेच एजी ऑफिसमध्ये प्रशिक्षण कालावधीत (प्रोबेशन प्रिरियड) कार्यरत होते. भूपेश हे मूळचे हरियाणाचे असून मित्रांसह क्वॉर्टर्समध्ये राहत होते.
शुक्रवारी रात्री मित्रांसह पार्टी केल्यानंतर भूपेश मोर कोणत्याही मित्राला न सांगता त्यांच्या क्वॉर्टर्समधून बाहेर पडले. त्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास सिव्हिल लाईन्स परिसरात मानस बंगल्याजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
धक्कादायक बाब म्हणजे भूपेश यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली आहे. तर त्यांची दुचाकी त्यांच्या मृतदेहापासून ४० ते ५० मीटर अंतरावर पडलेली आढळली. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement