एक्स्प्लोर
नगरपालिका निकाल : बारामती राष्ट्रवादीची, निलंगा भाजपकडे
पुणे/लातूर : पुणे आणि लातूरमधील 14 नगरपालिका निवडणुकीत बारामतीचा गड अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांनी राखला आहे. 39 जागांपैकी 35 जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीच्या पोर्णिमा तावडे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. तर इंदापूर आणि जेजूरी पालिकेचं नगराध्यक्षपद काँग्रेसने मिळवलं आहे.
तळेगाव, लोणावळा आणि आळंदी पालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. आळंदीत एकूण 18 जागापैकी 11 जागा जिंकत भाजपने आळंदीवर आपली सत्ता काबीज केली. तर दौंडमध्ये 24 पैकी 15 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. मात्र दौंडच्या नगराध्यक्षपदी नागरिक हित आघाडीच्या शितल कटारिया विजयी झाल्या आहेत.
तर सासवडमध्ये शिवसेनेच्या विजय शिवतारेंना धक्का बसला आहे. सासवडची सत्ता जनमत आघाडीने मिळवली आहे. 15 ठिकाणी जनमत आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना लोकल मित्र जन सेवा आघाडीला फक्त 4 जागा मिळवता आल्या आहेत..
याशिवा लातूरच्या औसा पालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. एकूण 20 पैकी 12 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. तर नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अफसर शेख हे विजयी झाले आहेत.
अहमदपूर पालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. एकूण 23 पैकी राष्ट्रवादीकडे 9, भाजपकडे 6, शिवसेना आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 2 तर बहुजन विकास आघाडीकडे 4 जागा आहेत. मात्र, नगराध्यक्षपद जिंकत बहुजन विकास आघाडीने सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवल्या आहेत.
दुसरीकडे उदगीरमध्ये एमआयएमने तब्बल 6 नगरसेवक निवडून आणले आहेत. तर भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी 7 जागा जिंकल्या आहेत.
14 नगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष!
या नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष लोणावळा तळेगाव-दाभाडे आळंदी उदगीर निलंगा कोणत्या नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष? बारामती औसा काँग्रेसचे दोन नगराध्यक्ष इंदापूर जेजुरीशिवसेनेचा एकमेव नगराध्यक्ष
जुन्नर इतरांकडे चार नगरपालिकांचं नगराध्यक्षपद दौंड – नागरिक हित आघाडी सासवड – जनमत विकास आघाडी शिरुर – शहर विकास आघाडी अहमदपूर – बहुजन विकास आघाडीतुमच्या जिल्ह्यातील नगरपालिकेवर सत्ता कुणाची?
पुणे
बारामती : एकूण जागा : 39 अंतिम निकाल राष्ट्रवादी : 35 जागा भाजप महायुती पुरस्कृत आघाडी : 4 जागा नगराध्यक्ष : पौर्णिमा तावडे : राष्ट्रवादी लोणावळा : एकूण जागा : 25 जागा अंतिम निकाल भाजपा-रिपाइं युती : 9 जागा काँग्रेस : 6 जागा शिवसेना : 6 जागा अपक्ष : 4 जागा नगराध्यक्ष : सुरेखा जाधव : भाजप दौंड : एकूण जागा : 24 अंतिम निकाल राष्ट्रवादी :15 जागा नागरिक हित : 9 जागा नगराध्यक्ष : शीतल कटारिया : नागरिक हित आघाडी तळेगाव-दाभाडे : एकूण जागा : 26 जागा अंतिम निकाल जनसेवा विकास आघाडी : 20 जागा (3 बिनविरोध) शहर सुधारणा विकास आघाडी : 6 जागा नगराध्यक्ष : चित्रा जगनाडे : भाजप आळंदी : एकूण जागा : 18 अंतिम निकाल भाजप : 11 जागा शिवसेना : 5 जागा अपक्ष शिवसेना पुरस्कृत : 2 जागा नगराध्यक्ष : वैजयंता उमरगेकर : भाजप इंदापूर : एकूण जागा : 17 अंतिम निकाल राष्ट्रवादी : 9 काँग्रेस : 8 नगराध्यक्ष : अंकिता मुकुंद शाह : काँग्रेस जेजुरी : एकूण जागा : 17 अंतिम निकाल काँग्रेस : 11 राष्ट्रवादी : 6 नगराध्यक्ष : वीणा सोनावणे : काँग्रेस जुन्नर : एकूण जागा : 16 अंतिम निकाल राष्ट्रवादी : 7 जागा शिवसेना : 6 जागा काँग्रेस : 1 जागा इतर : 3 जागा नगराध्यक्ष : श्याम पांडे : शिवसेना सासवड : एकूण जागा :19 अंतिम निकाल जनमत विकास आघाडी : 15 जागा शिवसेना-लोकमित्र सेवा आघाडी : 4 जागा नगराध्यक्ष : मार्तंड भोंडे : जनमत विकास आघाडी शिरुर : एकूण जागा : 21 अंतिम निकाल शहर विकास आघाडी : 16 जागा भाजप : 2 जागा अपक्ष : 2 जागा लोकशाही क्रांती : 1 जागा नगराध्यक्ष : वैशाली वाखारे : शहर विकास आघाडीलातूर
उदगीर : एकूण जागा : 38 अंतिम निकाल काँग्रेस : 14 जागा भाजप : 18 जागा एमआयएम : 6 जागा नगराध्यक्ष : बसवराज बागबंदे : भाजप औसा : एकूण जागा : 20 अंतिम निकाल राष्ट्रवादी : 12 जागा, काँग्रेस : 2 जागा भाजप : 6 जागा नगराध्यक्ष : अफसर शेख : राष्ट्रवादी काँग्रेस निलंगा : एकूण जागा : 20 अंतिम निकाल भाजप : 18 जागा काँग्रेस 2 जागा नगराध्यक्ष : बाळासाहेब शिंगाडे : भाजप अहमदपूर : एकूण जागा : 23 अंतिम निकाल राष्ट्रवादी काँग्रेस : 9 जागा भाजप : 6 जागा शिवसेना : 2 जागा काँग्रेस : 2 जागा बहुजन विकास आघाडी : 4 जागा नगराध्यक्ष : अश्विनी कासनाले : बहुजन विकास आघाडी ----------------------------- #नगरपालिकानिकाल : पुणे : बारामती नगरपालिका : नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या पौर्णिमा तावडे विजयी #नगरपालिकानिकाल : पुणे : बारामती नगरपालिका : एकूण जागा 39, भाजप 1 जागा #नगरपालिकानिकाल : लातूर : उदगीर नगरपालिका - एकूण जागा 38, भाजपा 7, काँग्रेस 7, एमआयएम 6 जागा #नगरपालिकानिकाल : लातूर : निलंगा नगरपालिका : एकूण जागा 20, भाजप 14, काँग्रेस 2, नगराध्यक्षपदी- भाजपाचे बाळासाहेब शिंगाडे #नगरपालिकानिकाल : पुणे - लोणावळा नगरपालिका : एकूण जागा 25, भाजपा-रिपाइं युती 7, काँग्रेस 3, शिवसेना 4, अपक्ष 2 जागा #नगरपालिकानिकाल : पुणे - जुन्नर नगरपालिका : एकूण 16, राष्ट्रवादी 4, शिवसेना 3, काँग्रेस 1, इतर 2 #नगरपालिकानिकाल : पुणे - आळंदी नगरपालिका : एकूण जागा 18, भाजप 11, शिवसेना 5, अपक्ष (शिवसेना पुरस्कृत) 2 #नगरपालिकानिकाल : पुणे - आळंदी नगरपालिकेत विद्यमान नगराध्यक्ष रोहिदास तापकीर पराभूत https://goo.gl/ENb2gk #नगरपालिकानिकाल : पुणे - तळेगाव दाभाडे नगरपालिका, एकूण जागा 26, जनसेवा विकास आघाडी 15 (3 बिनविरोध), शहर सुधारणा विकास आघाडी जागा #नगरपालिकानिकाल : पुणे - सासवड नगरपालिका - एकूण जागा 19, अंतिम निकाल - जनसेवा विकास आघाडी 15, लोकमित्र सेवा 4 जागा #नगरपालिकानिकाल : लातूर - उदगीर नगरपालिका - एकूण जागा 38, काँग्रेस 7, भाजप 5, एमआयएम 4 जागा #नगरपालिकानिकाल : पुणे - दौंड नगरपालिका : नागरिक हित पक्षाच्या शितल कटारिया नगराध्यक्षपदी विराजमान #नगरपालिकानिकाल : पुणे - शिरुर नगरपालिका एकूण जागा 21, अंतिम निकाल - शहर विकास आघाडी 15, भाजप 2, अपक्ष 2, लोकशाही क्रांती 1 जागा #नगरपालिकानिकाल : पुणे - दौंड नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता, अंतिम निकाल - एकूण जागा 24, राष्ट्रवादी 15, नागरिक हित 8 जागा #नगरपालिकानिकाल : पुणे - सासवड नगरपालिका - एकूण जागा 19, जनमत आघाडी 5 जागांवर विजयी #नगरपालिकानिकाल : पुणे - तळेगाव दाभाडे नगरपालिका - नगराध्यक्षपदी भाजपच्या चित्रा जगनाडे #नगरपालिकानिकाल : पुणे - लोणावळा नगरपालिका - एकूण जागा 25, शिवसेना 3, भाजपा 4, रिपाइं 1, अपक्ष 2, काँग्रेस 2 जागा #नगरपालिकानिकाल : पुणे - शिरुर नगरपालिका एकूण जागा 21- शहर विकास आघाडी 16, भाजप 2, अपक्ष 2 जागा #नगरपालिकानिकाल : पुणे - जेजुरी नगरपालिका : काँग्रेसच्या विणा सोनावणे नगराध्यक्षपदी #नगरपालिकानिकाल : पुणे - इंदापूर नगरपालिका : नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अंकिता मुकुंद शाह #नगरपालिकानिकाल : पुणे - आळंदी नगरपालिका - एकूण जागा 18, भाजप 6 (2 बिनविरोध), शिवसेना 5, अपक्ष 2 #नगरपालिकानिकाल : लातूर - अहमदपूर नगरपालिका अंतिम निकाल - एकूण जागा 23, राष्ट्रवादी काँग्रेस 9, भाजप 6, शिवसेना 2, काँग्रेस 2, बहुजन विकास आघाडी 4 जागा, बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कासनाले नगराध्यक्ष #नगरपालिकानिकाल : पुणे - दौंड नगरपालिका - एकूण जागा 24, राष्ट्रवादी- 3 जागांवर विजयी #नगरपालिकानिकाल : पुणे - जुन्नर नगरपालिका - एकूण जागा 16, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1, शिवसेना 2, आपला माणूस आपली आघाडी (मनसे-भाजप) 2 जागा #नगरपालिकानिकाल : लातूर - निलंगा नगरपालिका - एकूण जागा 20, भाजप 5, काँग्रेस 1 जागेवर विजयी #नगरपालिकानिकाल : पुणे - जुन्नर नगरपालिका - एकूण जागा 16, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 जागांवर विजयी #नगरपालिकानिकाल : पुणे - लोणावळा नगरपालिका - एकूण जागा 25, शिवसेना 3, भाजप 2, अपक्ष 2 जागांवर विजयी #नगरपालिकानिकाल : लातूर - उदगीर नगरपालिका - एकूण जागा 38, एमआयएम 2 जागा, काँग्रेस 1, भाजप 1 जागा #नगरपालिकानिकाल : पुणे - सासवड नगरपालिका - एकूण जागा 19, जनमत विकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी #नगरपालिकानिकाल : पुणे - शिरुर नगरपालिका - एकूण जागा 20, शहर विकास आघाडी 7, भाजप 2, एक अपक्ष बिनविरोध #नगरपालिकानिकाल : लातूर: औसा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा,20 पैकी राष्ट्रवादी 12,काँग्रेस 2,भाजप 6 जागांवर विजयी, राष्ट्रवादीचे अफसर शेख नगराध्यक्ष #नगरपालिकानिकाल : तळेगाव दाभाडेत जनसेवा विकास आघाडी 10 जागा (3 बिनविरोध), शहर सुधारणा विकास आघाडी 0, एकूण जागा 26 #नगरपालिकानिकाल : लातूर - उदगीरमध्ये एमआयएम 2, काँग्रेस 1 जागेवर विजयी, एकूण जागा 38 #नगरपालिकानिकाल : लातूर - औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी 2 जागांवर विजयी #नगरपालिकानिकाल : पुणे - जुन्नर नगरपालिकेत राष्ट्रवादी 2 जागांवर विजयी, एकूण जागा 16 #नगरपालिकानिकाल : पुणे - तळेगाव दाभाडेत जनसेवा विकास आघाडी 7 (3 बिनविरोध), शहर सुधारणा विकास आघाडी 0, एकूण जागा 26 #नगरपालिकानिकाल : लातूर - निलंगा नगरपालिकेत भाजप 3, काँग्रेस 1, एकूण जागा 20 #नगरपालिकानिकाल : आळंदी नगरपालिकेत शिवसेना 2, भाजपा 2 (बिनविरोध), एकूण जागा 18 #नगरपालिकानिकाल : शिरुर नगरपालिकेत शहर विकास आघाडी 20 पैकी 7 जागांवर विजयी, 1 अपक्ष उमेदवार बिनविरोध #नगरपालिकानिकाल : तळेगाव दाभाडेमध्ये जनविकास आघाडीला 26 पैकी 5 जागा #नगरपालिकानिकाल : दुसऱ्या टप्प्यातील 14 नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात ----------------------------- पुणे/लातूर : दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. पुण्यातील 10 आणि लातूरमधील 4 नगरपालिकांसाठी बुधवारी मतदान पार पडलं. पुणे आणि लातूरमधील एकूण 14 नगरपालिकांसाठी 1426 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. दुसऱ्या टप्प्यातील पुण्यातील नगरपालिका बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव-दाभाडे, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड आणि शिरुरमधील 324 जागांवर 1326 उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील लातूरमधील नगरपालिका लातूर जिल्ह्यातील उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर नगरपालिकांसाठीही आज मतदान झालं. 50 प्रभागांतील 101 उमेदवार आणि 4 नगराध्यक्षांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. अजित पवारांसमोरचं आव्हान आतापर्यंत पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र पुणे नगरपालिकेत भाजपने मुसंडी मारली तर तो अजित पवारांसाठी मोठा धक्का असेल. बारामतीत 39 सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळविण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचे अजित पवार यांच्यासमोर आव्हान आहे. पहिल्या टप्प्यातील 165 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. नगराध्यक्षपदांमध्ये राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर आहे. कोणाची प्रतिष्ठा पणाला? बारामती - अजित पवार इंदापूर - हर्षवर्धन पाटील निलंगा - संभाजी निलंगेकर पहिल्या टप्प्यात काय झालं? पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. तब्बल 31 नगरपालिका जिंकून भाजपनं मिनी विधानसभेत आघाडी घेतली आहे. सोबतच 52 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. नगरपालिकेसाठी भाजपने आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे. 27 नोव्हेंबर रोजी 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं. भाजपपाठोपाठ 20 नगरपालिका जिंकत काँग्रेसनं दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. काँग्रेसचेही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर आहे. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक आघाड्यांनाही बऱ्यापैकी यश मिळालं आहे. कारण त्यांचीही 25 नगरपालिकांवर सद्दी असणार आहे. तर त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल 34 आहे. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेना 25 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर काँग्रेसचे 22 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. आतापर्यंत 17 ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळालं आहे, तर 25 नगरपालिकांचं नगराध्यक्षपद हे इतर पक्ष आणि अपक्षांकडे गेलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
पुणे
क्रीडा
Advertisement