एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमदार चौधरींकडून मारहाण, जमावाकडून आमदारांच्या घरावर दगडफेक
जळगाव : जळगावमधील अमळनेर नगरपालिकेच्या मतदानादरम्यान गोंधळानंतर जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांना मारहाण झाली आहे. आमदार शिरीष चौधरींनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
अमळनेर नगरपालिका निवडणुकीवेळी जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांच्यात वाद झाला होता. या वादाचा रुपांतर मारहाणीत झालं. यामध्ये जखमी झालेल्या अनिल पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या मारहाणीनंतर अमळनेरमधील अनिल पाटील समर्थक आणि शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार शिरीष चौधरींच्या गाडीची तोडफोड केली. तसंच आमदार चौधरींनाही धक्काबुक्की केली. इतकंच नाही तर आमदार चौधरींच्या घरावर जमावाकडून दगडफेकही करण्यात आली. नंदुरबारमधून आलेल्या जवळपास 50 गाड्यांची तोडफोडही करण्यात आली.
जमावाकडून झालेल्या दगडफेकीत आमदार शिरीष चौधरींची पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता चौधरी आणि बहीण रेखा चौधरी जखमी झाल्या आहेत. त्यांना पोलीस बंदोबस्तातधुळ्यात आणण्यात आलं.
मात्र चौधरी कुटुंबीय मारहाण झाल्याचा बनाव करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. सध्या मळनेरमध्ये वातावरण तणावपूर्ण आहे. तसंच मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement