एक्स्प्लोर

साहित्य संमेलनाचे उद्घाटक ना. धो. महानोर यांना धमकीचा फोन; गृह खात्यानं पुरवली सुरक्षा

उद्यापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत असून या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ना. धो महानोर असणार आहेत. परंतु, ना. धो महानोर यांना तुम्ही संमेलनाला जाऊ नका, असा धमकीवजा फोन आला होता.

उस्मानाबाद : उद्यापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत असून या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ना. धो महानोर असणार आहेत. परंतु, ना. धो महानोर यांना तुम्ही संमेलनाला जाऊ नका, असा धमकीवजा फोन आला होता. तरिही याबाबत बोलताना आपण संमेलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती महानोर यांनी दिली आहे. तसेच गृह खात्यानं तातडीनं दखल घेत त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे.

अखित भारतीय साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. अशातच संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच वैचारिक वादळ उठल्याचे पाहायला मिळत आहे. संमेलनाचे उद्घाटक ना. धो महानोर यांनी संमेलनास जाऊ नये, असं त्यांना फोनवरून सांगण्यात आलं. यासंदर्भात ना. धो महानोर यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, धमकी हा शब्द माझ्या हिशोबात बसत नाही. धमकी मला दिलेली नाही, माझ्याशी फोनवरून संवाद साधण्यात आला. तसेच एक पत्र मला देण्यात आलं आहे. ब्राम्हण महासंघ पुण्याचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्र पाठवून सविस्तरपणे आपलं मत मांडलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड आम्हाला मान्य नाही. त्यांचं लेखन, त्यांची विचारसरणी हे आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे आम्ही पत्रकं काढून त्याचा निषेध करणार आहोत.' पुढे बोलताना ना. धो महानोर म्हणाले की, नियमानुसार एकमताने दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच नसून मी संमेलनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, 10 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो असणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. त्यानंतर 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली होती. मात्र त्यांच्या निवडीला अनेकांनी विरोध केला होता. दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित असल्यामुळे मराठी साहित्यामध्ये दिब्रिटो यांचे कामच नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदी त्यांची निवड करू नये अशी मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Ujani Helicopter Fish : घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
Girish Mahajan: 'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Embed widget