मुंबई: राज्यात बर्ड फ्लू च्या वाढत्या प्रभावाचा परिणाम थेट मटणाच्या महागाईवर झाला असून अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी मटणाच्या भावात वाढ केली आहे. त्यामुळे झणझणीत मटणाचा रस्सा खाणाऱ्या खवय्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे त्याचा परिणाम आता मटणाच्या दारावर झाल्याचे चित्र दिसतंय. बर्ड फ्लू अगोदर अनेकलस ठिकाणी 450 ते 500 रुपये प्रतिकिलो विकले जाणारे मटण आता 650 रुपयांच्या जवळपास विकले जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्याचवेळी चिकनच्या दरात घट होऊन त्याची विक्री प्रतिकिलो 100 रुपयांपर्यंत करण्यात येत आहे. पण त्याला म्हणावी तशी मागणी नाही.
हे पुण्य नव्हे पाप करताय! रंकाळ्यातील मृत बदकांच्या तपासणीतून धक्कादायक माहिती समोर
नांदेड शहरात मटणाचा दर जवळपास साडे सहाशे पर्यंत पोहचला आहे. बर्ड फ्लू मुळे मटण दुकानामध्ये खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. बर्डफ्लू संसर्गाचा परिणाम चिकन विक्री वर झाला असून परिणामी चिकनच्या दरात मोठी घट झाली आहे. मटणाची मागणी वाढल्यामुळे मटणाचे दर तेजीत आलेत. त्यामुळे बकऱ्यांची विक्री किंमतीत वाढ झाली असल्याची माहिती दुकानदारानी दिली आहे.
मंगळवेढ्यात मटणाचे दर गगनाला, कोंबडीकडे ग्राहकांची पाठ
मंगळवेढा तालुक्यात जंगलगी येथे बर्ड फ्लू सापडला. त्यानंतर मारापुर व भालेवाडी या भागातही कोंबड्या मरु लागल्याने प्रशासनाने या परिसरात कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर निर्बंध आणले. परिणामी जिल्ह्यात सर्वत्र चिकनकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता बोकडाच्या मटणाचे दर गगनाला भिडू लागले आहेत . पंढरपूर परिसरात बोकडाचे मटण आता 700 ते 750 रुपये किलोने विक्री केले जात आहे.
कोंबड्यांनंतर शेळ्यांवरही अज्ञात आजाराचं सावट, लातूरमधील शेतकऱ्याच्या नऊ शेळ्या दगावल्या
मटणासाठी बोकड मिळणे कमी झाल्याने हे दर अजून वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. सध्या बोकडाच्या मटणाची मागणी वाढत असली तरी बोकडाची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम मटणाच्या किंमतीवर झाला आहे. मटण साधारण 700 ते 750 या दराने विकले जात आहे. मटणासाठी बोकड मिळत नसल्याने अनेक मास विक्रीची दुकाने दिवसेदिवस बंद राहत आहेत.
या आधी 300 रुपये किलोने जाणारी गावरान देशी कोंबडी आता 160 रुपयालाही विकली जात नाही . हीच अवस्था बॉयलर कोंबडीची झाली असून आता बॉयलर कोंबड्या 130 ते 150 रुपयाच्या आसपास विकल्या जात आहेत. बर्ड फ्लूचा परिणाम अंडी विक्रीवरही झाला असून 8 रुपयाला विकली जाणारी देशी अंडी आता 3 रुपयालाही कोणी खरेदी करीत नाहीत. बर्ड फ्लू च्या भीतीमुळे ग्रामीण भागातील कोंबड्या मातीमोल भावाने खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांचे अर्थचक्रच बिघडले आहे.
रत्नागिरीतही मटणाचे दर वाढले
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला दिसून येत नाही. असं असलं तरी जिल्हा किंवा रत्नागिरी शहराचा विचार करता चिकनच्या मागणीत तसेच हॉटेलमधून मागविल्या जाणाऱ्या पदार्थांच्या मागणीत 50 टक्के घट झाली आहे. सध्या ग्राहकांनी पाठ फिरवल्यानं चिकनचे दर 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्याचवेळी मटण आणि मटणपासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये मात्र मात्र वाढ होतेय. शिवाय, माशांची मागणी देखील सध्या वाढली आहे. पुढील काही दिवसांत रत्नागिरीतील मटणाचे दर हे 700 रूपये किलोच्या पुढे जातील असा अंदाज सध्या मटण विक्रेते व्यक्त करत आहेत. जिल्ह्यात बर्ड फ्लू नसताना देखील सोशल मीडियाच्या फॉरवर्डेड मेसेजमुळे अफवा पसरत असल्याचे सांगत हॉटेल व्यवसायिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू! मुख्यमंत्री म्हणाले, 'अफवा अन् चुकीची माहिती पसरु नये'