कोल्हापूर : राज्यात सध्या बर्ड फ्लूच्या भीतीने नागरिकांच्या मनात थैमान घातलं आहे. अशातच कोल्हापूरच्या रंकाळा तलावामध्ये बदक मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढले. मृत बदकांचे नमुने पुण्याला पाठवल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदकांचे मृत्यू नेमके कशामुळे होतात पाहा या रिपोर्ट मधून.


कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह म्हणजे हा रंकाळा. इथल्या पोषक वातावरणामुळे परदेशी पाहुणे इथं स्थलांतरित होतात. मात्र, आता इथल्या पक्ष्यांसह प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. तो धोका मानवी वृतीमुळे झालाय. माणसं पुण्य मिळवण्यासाठी रंकाळ्यात अनेक खाद्यपदार्थ टाकतात. यामध्ये तळलेले पदार्थ देखील असतात. हेच पदार्थ खाऊन इथल्या तीन बदकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झालं आहे.


14 वर्षांपूर्वी केलेल्या 'बर्ड फ्ल्यू' गाण्यामुळे पोल्ट्री व्यवसाय वाचला होता, यावेळी तसं होईल का? महेश टिळेकरांची फेसबुक पोस्ट व्हायरल


या अहवालानुसार चिप्स किंवा इतर तळलेले पदार्थ बदक आणि पक्षांना पोषक नाहीत. त्यांची नैसर्गिक प्रक्रिया यामुळे बिघडून जाते. पुण्यातून आलेला अहवाल देखील तोच सांगतो. पण पुण्य मिळवण्याच्या नादात पक्षांचा जीव घेतो हे समजून घेणं गरजेचं आहे.


कोंबड्यांनंतर शेळ्यांवरही अज्ञात आजाराचं सावट, लातूरमधील शेतकऱ्याच्या नऊ शेळ्या दगावल्या


आज देखील रंकाळ्यात तळलेल्या पदार्थांच्या शेकडो रिकाम्या बॅग आढळून येतात. अनेक नियम केले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने याठिकाणी कठोर कारवाईसाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.


अफवा अन् चुकीची माहिती पसरु नये : मुख्यमंत्री


बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेवून नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले.


Satara Bird Flu | सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे बर्ड फ्लूचा शिरकाव, कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू