एक्स्प्लोर

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात दोन हत्या! एका घटनेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा तर दुसऱ्या घटनेत महिलेचा मृत्यू

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत.

पिंपरी चिंचवड : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत. पहिली घटना रात्री आठच्या सुमारास घडली. यात गृहमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन जाधवांची हत्या झाली. पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळ असलेल्या कोंदेवाडी फाट्यावर या घटनेची सुरुवात झाली. काल रात्री इथं सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी भांडण झालं. जाधव यांनी दिलेले पैसे ते परत करत नव्हते यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद शिगेला पोहोचला होता. यातूनच काल थिटे आणि सुर्यवंशीने त्यांची हत्या केली.

तिथून जाधव यांच्याच गाडीत मृतदेह टाकला आणि गाडी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने नेहली. पुणे जिल्हा संपताच नगर जिल्ह्यातील कोरथन घाट सुरू झाला. तिथं दरीत हा मृतदेह पेटवून दिला आणि गाडी तिथंच जवळपास सोडून दिली. पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा इरादा होता. दुसरीकडे जाधव घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने तपास सुरू झाला आणि आज जळालेल्या अवस्थेत जाधव यांचा मृतदेह आढळला. तपासाची चक्र फिरताच थिटे आणि सूर्यवंशी पोलिसांच्या अटकेत आले. 

दुसरी घटना थोरांदळे येथे घडली. इथं द्रौपदाबाई गिरे यांचा मृतदेह डोक्यावर इजा झालेल्या अवस्थेत आढळला. आदिवासी समाजाच्या द्रौपदाबाई मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. पण आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात त्या सध्या वास्तव्यास होत्या. इथंच शेतात राबून उदरनिर्वाह करायच्या. काल रात्री त्यांना एक फोन आला आणि त्या घराबाहेर पडल्या. बराचवेळ त्या घरी परतल्या नाहीत म्हणून शोध घेतला असता, जवळच रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला. या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शेवटचा फोन कोणी केला त्याचा शोध पोलीस घेतायेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात रात्रीत दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच नागरिक सुरक्षित आहेत का? खुद्द त्यांच्या कार्यकर्त्याचीच हत्या झाल्याने असे प्रश्न आता उपस्थित केले जातायेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parli Assembly constituency : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंविरोधात तगडा उमेदवार जाहीर; मराठा कार्ड दिल्याने तुल्यबळ लढत होणार!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंविरोधात तगडा उमेदवार जाहीर; मराठा कार्ड दिल्याने तुल्यबळ लढत होणार!
अभिनेत्रीचा पती राष्ट्रवादीत, फहाद अहमदला मुंबईतील उमेदवारी; जयंत पाटलांनी सांगितलं राज'कारण'
अभिनेत्रीचा पती राष्ट्रवादीत, फहाद अहमदला मुंबईतील उमेदवारी; जयंत पाटलांनी सांगितलं राज'कारण'
शरद पवारांची मोहोळमध्ये सरप्राईज उमेदवारी, लाडकी लेक मैदानात; माढ्यातून कुणाला उमेदवारी?
शरद पवारांची मोहोळमध्ये सरप्राईज उमेदवारी, लाडकी लेक मैदानात; माढ्यातून कुणाला उमेदवारी?
Babanrao Gholap : काल शिंदे गटाला जय महाराष्ट्र, आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुलाला तिकीट मिळाल्यानंतर बबनराव घोलपांची घरवापसी
काल शिंदे गटाला जय महाराष्ट्र, आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुलाला तिकीट मिळाल्यानंतर बबनराव घोलपांची घरवापसी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aavdiche Khane Rajkiya Tane Bane:माहिममधून माघार का घ्यायची,नेहरू उभे आहेत का?Sanjay Raut ExclusiveGanesh Gite Nashik : उमेदवारी मिळाल्यानंतर गणेश गीतेंचं नाशिकमध्ये स्वागतThackeray Group Ghatkopar :  घाटकोपर पश्चिममध्ये ठाकरे गटाकडून संजय भालेराव यांना उमेदवारीKolhapur BJP Conflict : कोल्हापुरातील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parli Assembly constituency : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंविरोधात तगडा उमेदवार जाहीर; मराठा कार्ड दिल्याने तुल्यबळ लढत होणार!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंविरोधात तगडा उमेदवार जाहीर; मराठा कार्ड दिल्याने तुल्यबळ लढत होणार!
अभिनेत्रीचा पती राष्ट्रवादीत, फहाद अहमदला मुंबईतील उमेदवारी; जयंत पाटलांनी सांगितलं राज'कारण'
अभिनेत्रीचा पती राष्ट्रवादीत, फहाद अहमदला मुंबईतील उमेदवारी; जयंत पाटलांनी सांगितलं राज'कारण'
शरद पवारांची मोहोळमध्ये सरप्राईज उमेदवारी, लाडकी लेक मैदानात; माढ्यातून कुणाला उमेदवारी?
शरद पवारांची मोहोळमध्ये सरप्राईज उमेदवारी, लाडकी लेक मैदानात; माढ्यातून कुणाला उमेदवारी?
Babanrao Gholap : काल शिंदे गटाला जय महाराष्ट्र, आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुलाला तिकीट मिळाल्यानंतर बबनराव घोलपांची घरवापसी
काल शिंदे गटाला जय महाराष्ट्र, आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुलाला तिकीट मिळाल्यानंतर बबनराव घोलपांची घरवापसी
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार! कोणासाठी निर्णायक ठरणार?
कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार! कोणासाठी निर्णायक ठरणार?
Radhakrishna Vikhe Patil : 'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
Amol Mitkari: अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
Embed widget