ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने एकाची हत्या
ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बेळगाव : राजकीय वैमनस्यातून हुक्केरी तालुक्यातील एकाचा सुलतानपूर येथे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शानुर साब दस्तागीर साब मुल्ला असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गावचा विकासा व्हावा यासाठी ग्रामपंचायत निवडणूक घेतली जाते. पण पराभव जिव्हारी लागल्याने एका गटाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनल एकमेकांविरूध्द उभे ठाकले होते. बुधवारी झालेल्या मतमोजणीत शानुर साब दस्तागीर साब मुल्ला यांच्या गटाचे दहा पैकी दहा उमेदवार निवडून आले होते. त्यांचा भाऊ बशीर मुल्ला हा देखील या निवडून आला होता. यापूर्वी सत्तेवर असलेल्या शब्बीर मुल्ला गटाचा निवडणुकीत धुव्वा उडाला होता. निवडून आल्यावर फटाके वाजवून बशीर मुल्ला आणि अन्य व्यक्तींनी आनंदोत्सव साजरा केला होता. नंतर बाजूच्या गावातील आपल्या पाहुण्यांना भेटून मिठाई वाटून आले होते. मिठाई वाटून आलेली घटना शब्बीर मुल्ला याला समजली.
पराभव जिव्हारी लागल्याने हत्या पराभव जिव्हारी लागलेल्या शब्बीर गटाच्या समर्थकांनी बशीर यांचे घर गाठले. त्यांच्या घरासमोर जावून धुडगूस घालायला सुरुवात केली. यावेळी बशीर यांचे बंधू शानुर हे घराबाहेर येवून त्यांना समजावून सांगत होते. त्यावेळी शब्बीर समर्थकांनी शानुर यांना ओढून काठी, लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शानुर गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेत त्यांना बेळगावच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात येत होते. पण उपचाराचा काही उपयोग न होता मुल्ला यांचा मृत्यू झाला.
Gram Panchayat Election : जळगावमधील 'या' गावांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, अर्जच भरला नाही!
उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटी 5 लाखांची बोली; व्हिडीओ व्हायरल
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याची धडपड, निधीचं अमिष कितपत योग्य?