एक्स्प्लोर
प्रेमप्रकरणातून परळीत युवकाची हत्या, पाच रुपयाच्या ब्लेडने दोन अल्पवयीन मुलांकडून कृत्य
दरम्यान, ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेतील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड : बहिणीसोबत सुरु असलेल्या प्रेम प्रकरणाच्या रागातून अल्पवयीन भावाने बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. बीड जिल्ह्यातील परळी शहरात ही घटना घडली आहे. हत्येच्या पाच तासाच्या आत पोलिसांनी या खून प्रकरणातील दोन्ही अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. परळी शहरात आज सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परळी शहर हादरले होते. गणेशपार भागातील अनिल हालगे (22) या युवकाचा मृतदेह सकाळी पोलीस ठाण्याला लागूनच असलेल्या कब्रस्तानमध्ये हा मृतदेह आढळून आला. पोलीस तपासात या युवकाच्या शरीरावर हत्याराने मारल्याच्या खुना दिसून आल्याने ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले. यातील अल्पवयीन असलेल्या आरोपीच्या बहिणीचे अनिल सोबत प्रेमसंबंध होते आणि याच्या रागातूनच आरोपीने अनिलची हत्या केल्याचं आता पोलीस तपासात समोर आले. विशेष म्हणजे या हत्येमध्ये अनिलच्या पूर्ण शरीरावरती जे वार करण्यात आले ते वार ब्लेडने करण्यात आले होते. ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हत्येत वापरलेले दगड, ब्लेड आणि तुकडे केलेला मयताचा मोबाईल पोलिसांना दिला. परळी शहर पोलिसांनी या प्रकरणात थोडाही विलंब न करता अवघ्या पाच तासात आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेतील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
पुणे
निवडणूक























